Coronavirus: कोरोना व्हायरसबाबत महत्त्वाची माहिती समोर; WHO च्या प्रमुखांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 09:20 PM2023-02-02T21:20:54+5:302023-02-02T21:21:36+5:30
३० जानेवारी २०२० रोजी भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून भारतात कोरोनाचे सुमारे साडेचार कोटी रुग्ण समोर आले आहेत.
नवी दिल्ली - गेल्या ३ वर्षापासून जगभरात कोविड महामारीचं संकट उभं राहिले आहे. या महामारीच्या जाळ्यात अनेक जण अडकले. कोविड-१९ मुळे गेल्या आठ आठवड्यात १.७० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. हे असे आकडे आहेत ज्यांचे अहवाल समोर आले आहेत. खरी संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असेल हे आम्हाला माहीत आहे असं विधान जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी केले आहे. त्याचसोबत कोरोना महामारी कधी संपणार नाही असा इशाराही WHO नं दिला आहे.
WHO च्या इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन इमर्जन्सी कमिटीने म्हटलं आहे की, जगातून कोरोना व्हायरस मनुष्य आणि प्राण्यांपासून दूर करणे जवळजवळ अशक्य आहे. केवळ आपण त्याचे भयंकर परिणाम कमी करू शकतो. लोकांचे मृत्यू कमी करू शकतात. लोकांना त्याचा संसर्ग होण्यापासून वाचवू शकतो. परंतु ही महामारी जागतिक आरोग्य आणीबाणी कायम राहील.
जगभरातील आरोग्य यंत्रणा कोविड-१९ शी झुंज देत आहेत. त्यामुळे इतर मोठ्या आजारांकडेही लक्ष देणे कठीण होत आहे. कारण कोविडला अजूनही प्रामुख्याने घेतले जात आहे. कोविड-१९ महामारीमुळे संपूर्ण जगाची आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे असंही कमिटीनं म्हटलं.
दरम्यान, कोरोना व्हायरसला(Corona Virus) कमी लेखणे ही एक मोठी चूक असू शकते. तो आपल्याला कायम सरप्राइज करेल. तो आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत राहील. म्हणूनच आपल्याला अधिक वैद्यकीय साधने आणि वैद्यकीय कर्मचार्यांची गरज आहे. हा विषाणू आपल्या माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये स्थिरावला आहे. आता अनेक पिढ्या संपणार नाहीत. म्हणूनच सर्वात मोठी गरज आहे ती योग्य लस आणि अधिक लसीकरणाची. जेणेकरून लोकांना रोगप्रतिकारक शक्ती दिली जाऊ शकते असं टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले.
भारतात काय परिस्थिती?
३० जानेवारी २०२० रोजी भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून भारतात कोरोनाचे सुमारे साडेचार कोटी रुग्ण समोर आले आहेत. चांगली गोष्ट म्हणजे जवळपास ९९ टक्के लोकही कोरोनामधून बरे झाले आहेत. भारतात तीन वर्षांत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. पहिली लाट घाबरवलं, दुसर्याने लाटेनं रडवलं आणि तिसर्याने बऱ्यापैकी सांभाळलं