कोरोनामध्ये ज्यांनी प्रियजन गमावले त्यांच्या कुटुंबीयांची 'या' पंतप्रधानांनी मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 12:13 PM2023-12-12T12:13:49+5:302023-12-12T12:20:54+5:30
Corona Virus : कोरोना व्हायरसच्या साथीने गेल्या 3 वर्षांत जगभर हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोना व्हायरसच्या साथीने गेल्या 3 वर्षांत जगभर हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कोविड-19 महामारीमध्ये आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांची माफी मागितली आहे. यूकेमध्ये आतापर्यंत 2.48 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी 2.32 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
ऋषी सुनक म्हणाले की, कोरोनात अनेकांनी जीव गमावल्यामुळे मला खूप दुःख झालं आहे. ऋषी सुनक यांनी त्यावेळी पंतप्रधान म्हणून बोरिस जॉन्सन यांनी निर्णयांवर देखील भाष्य केलं. तसेच पहिल्या कोरोना लॉकडाऊन कालावधीच्या आपली पत्नी अक्षता मूर्तीपेक्षा ते त्यांच्या आधीच्या 'बॉस'ला जास्त वेळा भेटले असल्याचं देखील सांगितलं.
ऋषी सुनक यांनीही ‘इट आऊट टू हेल्प आउट’ योजनेचा जोरदार बचाव केला. ही योजना सुरक्षित असून लोकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रिटनच्या हॉस्पिटॅलिटी उद्योगाला चालना देण्यासाठी ऑगस्ट 2020 मध्ये ऋषी सुनक यांनी ही योजना सुरू केली होती. या अंतर्गत लोकांना सवलतीच्या दरात जेवण देऊन रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
कोरोना महामारीची त्यावेळी दुसरी लाट होती. असं मानलं जात होतं की या योजनेमुळे यूकेमध्ये कोविड -19 संसर्ग वाढला, त्यानंतर ऋषी सुनक यांच्यावर टीका झाली.या आठवड्यात सुरू झालेल्या चौकशीत ऋषी सुनक यांनी स्वतःच्या वतीने पुरावे सादर केले आहेत.