Coronavirus: कोरोनाचे जगभरात 10049 बळी; चीनपेक्षा इटलीमध्ये मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 10:25 AM2020-03-20T10:25:20+5:302020-03-20T10:26:34+5:30

एकट्या इटलीमध्ये ३४०५ संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. तर इराणच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशात दर १० मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे

Coronavirus: Death toll 10049 worldwide; more in Italy Than China hrb | Coronavirus: कोरोनाचे जगभरात 10049 बळी; चीनपेक्षा इटलीमध्ये मृत्यू

Coronavirus: कोरोनाचे जगभरात 10049 बळी; चीनपेक्षा इटलीमध्ये मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देइराणच्या आरोग्य विभागाचे प्रवक्ते कियानोश जहानपूर यांनी ट्विट करून इराणमधील भयावय स्थिती मांडली आहे. पुढील १५ दिवस देशातील कोणाताही बाजार उघडणार नाही, असे आदेश राष्ट्रपती हसन रुहानी यांनी दिले आहेत.

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने जगभरात रौद्र रुप धारण केले असून १७९ देशांना विळखा घातला आहे. आतापर्यंत 10049 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अडीज लाखांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. तर ८८४४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. हैराण करणारी बाब म्हणजे ज्या देशातून कोरोनाची उत्पत्ती झाली त्या देशात म्हणजेच चीनमध्ये रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात यश आले आहे. तर इराण आणि इटलीला या व्हारसचा मोठा फटका बसला आहे.

एकट्या इटलीमध्ये ३४०५ संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. तर इराणच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशात दर १० मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे. तर प्रत्येक ५० मिनिटांनी नवीन रुग्ण समोर येत आहे. पाकिस्तानमध्ये गुरुवारपर्यंत ४५३ जण संक्रमित आढळले आहेत. तर दोघांचा मृत्यू झालेला आहे. अमेरिका आता रस्त्यावर सैन्याला उतरविणार आहे.

 

चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या पसरण्यावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. शुक्रवारी सकाळी तिथे मृत्यूंची संख्या ३२४५ तर इटलीमध्ये ३४०५ होती. सीएनएननुसार इटली सरकार कोरोना व्हायरसला रोखण्यात अपयशी ठरले आहे. त्यांनी केलेले उपाय कामी आलेले नाहीत. इटलीने सैन्यालाही रस्त्यावर आणले आहे. शेवटच्या वर्षाला असलेल्या तब्बल १० हजार वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्टर केले आहे. तरीही त्यांनी मृत्यूच्या संख्येत चीनला मागे टाकले आहे.

इराणच्या आरोग्य विभागाचे प्रवक्ते कियानोश जहानपूर यांनी ट्विट करून इराणमधील भयावय स्थिती मांडली आहे. बुधवार आणि गुरवारच्या मधील २४ तासांमध्ये १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात मृतांचा आकडा १२८४ झाला आहे. तर १८४०७ जण संक्रमित आहेत. पुढील १५ दिवस देशातील कोणाताही बाजार उघडणार नाही, असे आदेश राष्ट्रपती हसन रुहानी यांनी दिले आहेत.

अमेरिकेमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात सदस्यांच्या या कुटुंबातील उर्वरित सदस्य व्हेंटिलेटरवर आहेत. पेटॅगॉनने ट्रम्प सरकारला दोन मोबाईल मेडिकल जहाजे वापरण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकी हवाई दलाची एक मेडिकल टीमही तैनात करण्यात आली आहे.

Web Title: Coronavirus: Death toll 10049 worldwide; more in Italy Than China hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.