China Coronavirus : जगभरात अलर्ट! कोरोना व्हायरसमुळे 41 जणांनी गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 08:54 AM2020-01-25T08:54:17+5:302020-01-25T09:02:31+5:30
चीनने 13 शहरांमध्ये प्रवासावर निर्बंध आणले आहेत.
बीजिंग - चीनमध्येकोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 800 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. चीनने 13 शहरांमध्ये प्रवासावर निर्बंध आणले आहेत. या निर्णयाचा 4.1 कोटी लोकांना फटका बसला आहे. चीनमध्ये वेगाने व्हायरस पसरल्यानंतर भारत, अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये व्हायरससाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. चीनच्या हुबेई प्रांताच्या जिंगझोऊमध्ये सर्वात प्रथम हा विषाणू आढळला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातून जाणाऱ्या सर्व रेल्वे सेवा बंद राहतील, तर सार्वजनिक बस, पर्यटन बस फेऱ्या व अन्य नौका सेवा अस्थायी स्वरूपात बंद ठेवण्यात आल्या आहेत.
हुबेई प्रांताच्या आजूबाजूच्या चार शहरांत शियानिंग, शियोगान, एन्शी आणि जिजांग शहरांत प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूंच्या धास्तीने शांघाई डिज्निलँड या आठवड्यात पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी चीन येत्या दहा दिवसांत नवीन रुग्णालय उभं करणार आहे. वुहान शहरात हे रुग्णालय उभारण्यात येणार असून युद्धपातळीवर त्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. चीनमधील स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी रुग्णालय उभारण्यास सुरुवात झाली आहे. 25 हजार स्कवेअर मीटरमध्ये हे रुग्णालय उभे राहणार असून त्यामध्ये 1 हजार बेडची व्यवस्था असणार आहे. रुग्णालय उभारण्याचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत.
Corona Virus : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी चीन उभारणार 10 दिवसांत रुग्णालयhttps://t.co/mYchcGQBcV#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) January 24, 2020
चीनमधील व्हायरसच्या प्रसाराने भारताची काळजीही वाढली आहे. कारण, जवळपास ७०० भारतीय विद्यार्थी वुहान आणि आजूबाजूच्या परिसरात राहतात. बहुतांश विद्यार्थी चीनच्या विद्यापीठात शिकत आहेत. चीनमध्ये पसरलेल्या कोराना विषाणूंमुळे बीजिंगस्थित भारतीय दूतावासाने प्रजासत्ताक दिनानिमित्तचा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे.या आजारामुळे चीनमध्ये आतापर्यंत 41 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. भारतीय दूतावासाने 26 जानेवारीला आयोजित केलेला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचं दूतावासाने ट्विट केलं आहे.
सी-फूड ठरू शकतं कारण
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, कोरोना व्हायरस सी-फूडसंबंधी एक आजार आहे. हा आजार चीनमध्ये सी-फूड बाजारातून पसरला आहे. हा व्हायरस उंट, मांजर, वटवाघूळसहीत अनेक प्राण्यांमध्ये पसरल्यानंतर मनुष्यांमध्ये वेगाने पसरतो.
या व्हायरसची लक्षणे निमोनियासारखीच आहेत. कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्णाला सर्वातआधी श्वास घेण्याची समस्या होते. त्यासोबतच आणखीही काही लक्षणे बघायला मिळतात. जसे की, घशात वेदना किंवा जळजळ होणे, सर्दी, खोकला, ताप आणि किडनीशी संबंधित समस्याही होऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
'हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्यांचा खेळ नाही'; सामनातून 'मनसे'वर टीकास्त्र
शिवसेनेचे आदित्य विरुद्ध मनसेचे अमित; दोन युवा ठाकरेंच्या वाटचालीकडे लक्ष
राज्यातील राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी सुरू, तत्कालीन भाजप सरकारवर आक्षेप
कोरेगाव भीमा दंगलीचा तपास ‘एनआयए’कडे
बिहारप्रमाणे राज्यातही बोगस हॉस्पिटल; ना डॉक्टर ना पेशंट, बोटांचे ठसे बनवून डॉक्टरांची हजेरी