Coronavirus : ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर! एका दिवसात तब्बल 708 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 03:17 PM2020-04-05T15:17:47+5:302020-04-05T15:20:33+5:30
Coronavirus : जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 64,754 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
लंडन - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 64,754 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 12,03,459 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 2,46,803 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3500 वर पोहोचला आहे. ब्रिटनमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. एका दिवसात तब्बल 700 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ब्रिटनमध्ये शनिवारी (5 एप्रिल) एकाच दिवसात कोरोना व्हायरसमुळे 708 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 40 हजारांहून अधिक झाला आहे. तर ब्रिटनमध्ये आतापर्यंत 4313 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील सुमारे 200 देशांमधील विविध रुग्णालयांमध्ये 8 लाख 50 हजारांहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू असून त्यातील 40 हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे 8 लाख 11 हजार रुग्णांमध्ये कोरोनीची लक्षणे अतिशय सौम्य आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
Coronavirus : सॅनिटायझर वापरून दिवा लावणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण https://t.co/qKGSHiqacS#coronavirusinindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 5, 2020
कोरोना विषाणूमुळे झालेल्या प्रादुर्भावाने अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 3 लाखांहून रुग्ण असून चिंतेची बाब म्हणजे गेल्या 24 तासांत तिथे 13 हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 7 हजार 900 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे आणि त्यात 450 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क आणि परिसरात सर्वाधित रुग्ण आढळले आहेत. येथील बाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. अमेरिकेखालोखाल कोरोनाने ज्या देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्यापैकी बहुतांश देश युरोपातील आहेत. आतापर्यंत इटलीमध्ये 14 हजार 700 तर स्पेनमध्ये 11 हजार 800 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. फ्रान्समध्ये 7,560, ब्रिटन 4,313, इराण 3,452, जर्मनी 1,444 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3500 वर, 'या' वयोगटातील लोकांना सर्वाधिक धोकाhttps://t.co/MeUZTcZu71#coronaupdatesindia#CoronavirusOutbreakindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 5, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : सॅनिटायझर वापरून दिवा लावणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा
Coronavirus : ...म्हणून 'पबजी' 24 तास राहणार बंद
Coronavirus : धक्कादायक! ICU ला असलेल्या कुलूपाने संपवला तिचा जीवनप्रवास