Coronavirus: खुलासा! लसीकरणानंतरही जीवघेणा ठरतोय कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट; ‘या’ वयातील लोकांना अधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 12:34 PM2021-06-29T12:34:30+5:302021-06-29T12:36:44+5:30

Delta Variants of Coronavirus: लसीकरण अभियानातंर्गत ब्रिटनच्या लोकांना एस्ट्राजेनेका आणि फायझर या दोन्ही लसीचे डोस दिले होते. जगभरातील अनेक देशात या लसीचा वापर होत आहे.

Coronavirus: Delta variants of the corona are still life-threatening after vaccination says UK Data | Coronavirus: खुलासा! लसीकरणानंतरही जीवघेणा ठरतोय कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट; ‘या’ वयातील लोकांना अधिक धोका

Coronavirus: खुलासा! लसीकरणानंतरही जीवघेणा ठरतोय कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट; ‘या’ वयातील लोकांना अधिक धोका

Next
ठळक मुद्देशुक्रवारी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये, आतापर्यंत ब्रिटनमधील ११७ लोकांचा डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यू झाला आहे. ५० वर्षापेक्षा कमी वयातील लसीकरण घेणाऱ्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. माणसाचं वय जितकं जास्त असेल तितकं संक्रमण आणि मृत्यूचा धोका जास्त वाढतो.

कोरोना व्हायरसच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटनं जगातील अनेक देशांची चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटला सर्वात धोकादायक असल्याचं मानत व्हेरिएंट ऑफ कंसर्न यादीत टाकलं आहे. कोरोनाचा नवा डेल्टा व्हेरिएंट हा लसीकरण झालेल्या लोकांनाही मृत्यूच्या दारात ओढत असल्याचा  धक्कादायक खुलासा एका रिपोर्टमधून समोर आला आहे.

पब्लिक हेल्थ इंग्लंडनुसार, शुक्रवारी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये, आतापर्यंत ब्रिटनमधील ११७ लोकांचा डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्यांमध्ये १०९ जणांचा समावेश आहे. त्यातील ५० लोक असे आहेत ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. रिपोर्टप्रमाणे, ५० वर्षापेक्षा कमी वयातील लसीकरण घेणाऱ्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. डेल्टा व्हेरिएंटच्या जाळ्यात अडकलेल्या ५० पेक्षा कमी वय असलेल्या मृतांमध्ये ८ जणांचा समावेश आहे. त्यात लसीचा सिंगल डोस घेणाऱ्या दोघांचा समावेश आहे.

याची सरासरी आकडेवारी पाहिली तर मृत्यू दर ०.१३ इतका आहे. मात्र यामुळे कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंटवर कोविड लस प्रभावी ठरत नाही का? असा प्रश्न उभा राहतो. लसीकरण अभियानातंर्गत ब्रिटनच्या लोकांना एस्ट्राजेनेका आणि फायझर या दोन्ही लसीचे डोस दिले होते. जगभरातील अनेक देशात या लसीचा वापर होत आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये एक डेटा जारी करण्यात आला होता. यात फायझर लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर डेल्टा व्हेरिएंटपासून ८८ टक्के बचाव होऊ शकतो आणि एस्ट्राजेनेका लस ६० टक्के बचाव करू शकते असं सांगितलं होतं. परंतु डेविड स्पाईगेहेल्टर आणि अँथोनी मास्टरसारखे तज्ज्ञ म्हणतात कोविड १९ मृत्यूमध्ये वय हाही एक मोठा आधार मानला जातो.

तज्ज्ञांचा दावा आहे की, माणसाचं वय जितकं जास्त असेल तितकं संक्रमण आणि मृत्यूचा धोका जास्त वाढतो. त्यामुळे ८० वर्षावरील लस घेतलेल्या लोकांमध्ये संक्रमणाचा धोका ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्या तुलनेत जास्त असू शकतो. त्यामुळे काही लोकांचा जीव जातो. WHO नं शुक्रवारी डेल्टा व्हेरिएंटवर सतर्कता बाळगण्याचं आवाहन करत म्हटलं की, ज्यांनी लसीकरण पूर्ण केलंय त्यांनी अधिक काळजी घेणं गरजेचे आहे. लसीचे दोन्ही डोस घेतले तरी मास्क घाला, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करा. हात स्वच्छ धुवावे. ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत ते पूर्णत: संरक्षित नाही. जरी ते लोक संक्रमित झाले, त्यांच्यात कोणतंही लक्षण नसेल तरी ते संक्रमण वाढवण्यात मदत करत राहतील असं WHO च्या डॉ. मैरिएंजेला सिमाओ यांनी सांगितले.

एसिसोएटेड प्रेसच्या रिपोर्टप्रमाणे, अमेरिकेतही मे महिन्यात पूर्ण लसीकरण झालेल्या ०.८ टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत नव्या कोविड रुग्णांमध्ये २० टक्के रुग्ण हे डेल्टा व्हेरिएंटमुळे संक्रमित झाल्याचं डॉ. एंथनी फाउची यांनी सांगितले. डेल्टा व्हेरिएंटनं कोरोनाच्या लढाईत अमेरिकेचे प्रयत्न अयशस्वी केले आहेत. सध्याची अवस्था पाहिली तर अमेरिका या व्हेरिएंटसोबत लढण्याची रणनीती आखत आहे असंही फाउची म्हणाले.

Web Title: Coronavirus: Delta variants of the corona are still life-threatening after vaccination says UK Data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.