CoronaVirus : अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा कहर! दररोज एक लाखाहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 08:58 PM2021-08-13T20:58:33+5:302021-08-13T21:01:17+5:30

CoronaVirus: अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी अतिरिक्त डोसला मान्यता दिली. फ्रान्स आणि इस्रायलसारख्या इतर काही देशांमध्येही असाच सल्ला देण्यात आला आहे.

CoronaVirus: Delta variants in US! More than one lakh new patients every day | CoronaVirus : अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा कहर! दररोज एक लाखाहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण

CoronaVirus : अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा कहर! दररोज एक लाखाहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण

googlenewsNext

वाशिंग्टन : कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा अमेरिकेत कहर केला आहे. दररोज एक लाखाहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थित अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना लसीचा अतिरिक्त डोस घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपासून चांगले संरक्षण मिळू शकते. कोरोनाचा हा व्हेरिएंट देशात वेगाने पसरत आहे. (america those with weak immune system in america will get extra dose corona patients are increasing rapidly in hospitals across the country)

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी अतिरिक्त डोसला मान्यता दिली. फ्रान्स आणि इस्रायलसारख्या इतर काही देशांमध्येही असाच सल्ला देण्यात आला आहे. वृत्तसंस्था 'आयएएनएस'ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील कोरोनाच्या दैनंदिन प्रकरणामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. अमेरिकेत सध्या दररोज एक लाखाहून अधिक नवे कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.


अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या आरोग्य संस्थेचे संचालक रोशेल वालेंस्की यांनी सांगितले की, "आम्ही देशभरात नवीन प्रकरणे, रुग्णालयात दाखल होणे आणि मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे पाहत आहोत. देशातील सुमारे ९० टक्के लोकांना संसर्ग झाला आहे."

वालेंस्की यांच्या मते, गेल्या आठवडाभरातून दररोज सरासरी १,१३,००० रुग्णांची नोंद झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत ही वाढ २४ टक्क्यांनी नोंदविली गेली आहे. सध्या रुग्णालयात दररोज सरासरी ९,७०० रुग्णांना दाखल केले जात आहे. दररोज सरासरी ४५२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: CoronaVirus: Delta variants in US! More than one lakh new patients every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.