coronavirus: दुहेरी समस्या : आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात भारताकडूनही नियमात बदल झाल्याने अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 06:19 AM2020-05-13T06:19:53+5:302020-05-13T06:20:19+5:30
एच-१ बी व्हिसाधारक भारतीयांनी मागच्या महिन्यात व्हाईट हाऊसकडेही अर्ज दाखल करून नोकरी गेल्याने अमेरिकेतील आमच्या वास्तव्यासाठीची मुदत ६० दिवसांऐवजी १८० दिवस करण्याची विनंती राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केली होती.
वॉशिंग्टन : एअर इंडियाने कोरोनामुळे जागतिक प्रवासावर निर्बंध घातल्याने जन्माने अमेरिकन नागरिक असलेल्या अनेक भारतीय एअर इंडियाच्या विशेष विमानाने मायदेशी येऊ शकत नाहीत. भारत सरकारने मागच्या महिन्यात आंतरराष्टÑीय प्रवासासंदर्भात नियमात बदल करून विदेशी नागरिकांना आणि विना व्हिसा प्रवासाची परवानगी देणाऱ्या मूळ भारतीय नागरिकांना (ओसीआय कार्डधारक) आंतरराष्टÑीय प्रवासासाठी बंदी घातल्याने एच-१ बी व्हिसाधारक किंवा ग्रीन कार्डधारकांना दुहेरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
अमेरिकेतील वास्तव्यासाठी द्यावी मुदतवाढ...
एच-१ बी व्हिसाधारक भारतीयांनी मागच्या महिन्यात व्हाईट हाऊसकडेही अर्ज दाखल करून नोकरी गेल्याने अमेरिकेतील आमच्या वास्तव्यासाठीची मुदत ६० दिवसांऐवजी १८० दिवस करण्याची विनंती राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केली होती.
एका महिलेने सांगितले, मला भारतात जाण्यासाठी तिकीट देण्यात आले; परंतु माझा तीन महिन्यांचा मुलगा अमेरिकन नागरिक असल्याने त्याला तिकीट दिले नाही.
वॉशिंग्टन डीसी येथील राकेश गुप्ता (नाव बदलले आहे) यांनी सांगितले, माझी नोकरी गेली. ते आणि त्यांच्या पत्नी भारतीय नागरिक आहेत. त्यांना तिकिटे मिळाली; परंतु त्यांची अडीच वर्षांची मुलगी ओसीआय कार्डधारक असल्याने तिला तिकीट नाकारण्यात आले.
एच-1 बी
व्हिसाधारक किती भारतीयांची नोकरी गेली, याची अधिकृत माहिती नाही. कोरोनामुळे अमेरिकेतील बेरोजगारीचा दर खूप वाढला आहे. मागच्या दोन महिन्यांत जवळपास ३.३. कोटी अमेरिकन बेरोजगार झाले आहेत.