Coronavirus: कोरोना प्रतिबंधक लस तयार; मानवावर चाचणी घेण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 01:33 PM2020-04-23T13:33:01+5:302020-04-23T13:35:16+5:30

ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये एकूण ५१० स्वयंसेवकांवर ही चाचणी केली जाणार आहे.

Coronavirus: Efforts are underway to develop corona vaccines at 150 locations around the world mac | Coronavirus: कोरोना प्रतिबंधक लस तयार; मानवावर चाचणी घेण्याचे काम सुरू

Coronavirus: कोरोना प्रतिबंधक लस तयार; मानवावर चाचणी घेण्याचे काम सुरू

googlenewsNext

जगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 26 लाख 37 हजारांवर गेली असून, मृतांचा एकूण आकडा 1 लाख 84 हजारांच्या घरात पोहोचला आहे. तर आतापर्यंत जगभरात 7 लाख 17 हजार 635 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. 

कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी जगभरात १५० ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहे. जर्मनीमध्ये माणसांवर लसीच्या क्लिनिकला चाचण्या घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जर्मनीतील बायॉनटेक आणि पिफायझर या अमेरिकन कंपनीने मिळून कोरोना व्हायरसला रोखणारी एक लस विकसित केली आहे. तसेच इंग्लंडमध्येही या आठवड्यातच मानवावर चाचणी घेण्याचे काम सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये एकूण ५१० स्वयंसेवकांवर ही चाचणी केली जाणार आहे. या सर्वांचे वय १८ ते ५५ या दरम्यान आहे. तसेच ही चाचणी ८० टक्के यशस्वी होणार असल्याचा दावा देखील लसीच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे प्राध्यापक सरा गिलबर्ट यांनी केला आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबरपर्यंत या लसीचे लाखो डोस निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे, असे विद्यापीठाच्या जेनर इन्स्टिट्यूटने सांगितले आहे.

दरम्यान, अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 47,676 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 848,994 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेनंतर इटलीत सर्वाधिक मृत्यू झाले असून कोरोनाग्रस्तांची संख्या 187,327 वर गेली आहे. तर तब्बल 25,085 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमधील एकूण मृत्यूची संख्या 21,717 वर गेली आहे. कोरोनामुळे  चीनमध्ये 4,632, स्पेनमध्ये 21,717, इराणमध्ये 5,391, फ्रान्समध्ये 21,340, जर्मनीमध्ये 5,315 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Web Title: Coronavirus: Efforts are underway to develop corona vaccines at 150 locations around the world mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.