Coronavirus : ...म्हणून 'या' देशाने थांबवला हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 02:17 PM2020-04-10T14:17:22+5:302020-04-10T14:20:03+5:30

Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 90 हजारांच्या वर पोहोचला आहे.

Coronavirus france has stopped treating corona patients with hydroxychloroquine SSS | Coronavirus : ...म्हणून 'या' देशाने थांबवला हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापर

Coronavirus : ...म्हणून 'या' देशाने थांबवला हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापर

googlenewsNext

पॅरिस - संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 90 हजारांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही इटली, स्पेन आणि अमेरिकेतील रुग्णांची आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा साडेपाच हजारांच्या वर पोहोचला आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र फ्रान्सने 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीन' या औषधाचा वापर थांबवला आहे.

फ्रान्समधील एका रुग्णालयाने कोरोनासाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा वापर थांबवला आहे. फ्रान्समधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल सेंटर ऑफ नाइसने हा निर्णय घेतला आहे. या औषधामुळे रुग्णांच्या हृदयावर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सध्या रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधांचा वापर करण्यात येत आहे. 22 मार्चपासून या रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर या औषधांचे चार वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. त्यामध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचाही समावेश होता.

रुग्णालयाचे कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. एमाइल फेरारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधांचे काही प्रतिकूल परिणामही समोर आले आहेत. काही रुग्णांसाठी हे औषध धोकादायक ठरत असल्याची बाब समोर आली आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 117,749 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 12,210 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. फ्रान्समध्ये मागील महिन्यापासून लॉकडाऊनचा आदेश लागू करण्यात आला आहे. 

कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 90 हजार 938 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 18 हजार 279 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्येही कोरोनामुळे मृत्यूचे थैमान सुरू आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 15 हजार 238 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या अमेरिकेत  कोरोनामुळे 14 हजार 830 जणांचा मुत्यू झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहे. न्यूयॉर्कमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कोरोनामुळे 799 जणांचा मृत्यू झाला आहे. तर फ्रान्समध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 10 हजार 869 जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 coronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान थांबता थांबेना, जगभरात 90 हजारांहून अधिक मृत्युमुखी

CoronaVirus: दिलासादायक! कोरोनाबद्दलची 'ही' आकडेवारी वाचून तुम्हालाही बरं वाटेल

 

Web Title: Coronavirus france has stopped treating corona patients with hydroxychloroquine SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.