Coronavirus : फ्रान्समध्ये कोरोनाचा हाहाकार! 24 तासांत तब्बल 833 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 04:01 PM2020-04-07T16:01:30+5:302020-04-07T16:06:25+5:30
Coronavirus : फ्रान्समध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 8911 पर्यंत पोहचली आहे.
पॅरिस - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 75,896 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 13,58,857 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 2,90,643 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 4000 वर पोहोचला आहे. फ्रान्समध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. 24 तासांत तब्बल 833 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
फ्रान्समध्ये सोमवारी ( 6 एप्रिल ) एका दिवसात कोरोनामुळे 833 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकाच दिवसात नोंदवण्यात आलेली ही सर्वाधिक संख्या आहे. फ्रान्सचे आरोग्य मंत्री ऑलिव्हर वेरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्समध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 8911 पर्यंत पोहचली आहे. तसेच कोरोनामुळे फ्रान्समध्ये 17 मार्चपासूनच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. फ्रान्सने आता दररोज रुग्णालयासह नर्सिंग होममधील करोनाबाधितांच्या मृतांची संख्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
एकाच दिवसात मृत्यू झालेल्या नागरिकांमधील 605 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या 24 तासांत जवळपास 478 जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती फ्रान्सच्या आरोग्यमंत्र्यानी दिली आहे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाखाजवळ पोहचली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Coronavirus : सायकलसाठी जमा केलेल्या पैशांचा उपयोग भारी; 'या' चिमुकल्याची बातच न्यारीhttps://t.co/A4dOAxdm2j#coronaupdatesindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 7, 2020
ब्रिटनमध्येही शनिवारी (5 एप्रिल) एकाच दिवसात कोरोना व्हायरसमुळे 708 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 40 हजारांहून अधिक झाला आहे. तर ब्रिटनमध्ये आतापर्यंत 4313 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील सुमारे 200 देशांमधील विविध रुग्णालयांमध्ये 8 लाख 50 हजारांहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू असून त्यातील 40 हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे 8 लाख 11 हजार रुग्णांमध्ये कोरोनीची लक्षणे अतिशय सौम्य आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : सायकलसाठी जमा केलेल्या पैशांचा उपयोग भारी; 'या' चिमुकल्याची बातच न्यारी
Coronavirus : कोरोनाचा असाही फायदा! तब्बल 7 वर्षांनी कुटुंबियांना सापडला बेपत्ता मुलगा
Coronavirus: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ, गेल्या २४ तासात तब्बल ३५४ नवे रुग्ण