CoronaVirus : खूशखबर! कोरोनाच्या खात्म्यासाठी वैज्ञानिकांनी शोधलं नवं हत्यार! आता 'जीन व्हेरिअंट' जगाला तारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 04:46 PM2022-01-18T16:46:04+5:302022-01-18T16:46:47+5:30
या अध्ययनासाठी कोरोना संसर्गामुळे ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशा आफ्रिकन वंशाचे 2,787 लोक आणि सहा वेगवेगळ्या गटातील 1,30,997 लोकांचा समावेश करण्यात आला होता.
कोरोनाने संपूर्ण जगातच हाहाकार माजवला आहे. त्यापासून अद्यापही लोकांची मुक्तता झालेली नाही. दरम्यान, काही स्वीडिश संशोधकांनी एका शोधात मोठा दावा केला आहे. संशोधकांनी एक खास जीन व्हेरिअंट शोधून काढला आहे. तो गंभीर कोरोना संसर्गापासून लोकांचे संरक्षण करू शकेल. स्वीडनमधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील संशोधकांच्या नेतृत्वाखाली एका आंतरराष्ट्रीय टीमने वेगवेगळ्या ठिकांच्या लोकांचे अध्ययन करून हा व्हेरिअंट शोधून काढला आहे.
'नेचर जर्नल' या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. यात, जीन्स कोरोना संसर्गाच्या प्रभावावर परिणाम टाकू शकतात. यावरून एखाद्या व्यक्तीला किती प्रमाणात कोरोना संसर्गाची लागण झाली आहे, हे कळू शकते, असे सांगण्यात आले आहे.
या अध्ययनासाठी कोरोना संसर्गामुळे ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशा आफ्रिकन वंशाचे 2,787 लोक आणि सहा वेगवेगळ्या गटातील 1,30,997 लोकांचा समावेश करण्यात आला होता.
यासंदर्भात बोलताना अध्ययनाच्या मुख्य लेखिका तथा व्हीए बोस्टन हेल्थकेयर सिस्टिमच्या संशोधक जेनिफर हफमॅन म्हणाल्या, 'आफ्रिकन वंशाच्या लोकांमध्ये असलेल्या समान संरक्षणाने आम्हाला डीएनएचा विशिष्ट जीन व्हेरिअंट (RS10774671-G) शोधून काढण्यासाठी प्रेरित केले. जे कोरोनापासून संरक्षण प्रदान करते. महत्वाचे म्हणजे, आफ्रिकन वंशाच्या 80 टक्के लोकांमध्ये हा प्रोटेक्टिव्ह व्हेरिअंट आढळून आला आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.
संशोधकांच्या मते, प्रोटेक्टिव जीन व्हेरिएंट (RS10774671-G), जीन OAS1 द्वारे एन्कोड केलेल्या प्रोटीनची लांबी निर्धारित करतो. आधीच्या काही अध्ययनावरून असेही समजते की, प्रोटीनचा हा लांब व्हेरिअंट SARS-CoV-2, व्हायरस जो COVID-19 चे कारण बनतो, त्याला तोडण्यासही अधिक प्रभावी आहे. याशिवाय, "जेनेटिक रिस्क फॅक्टर्स आम्हाला चांगल्या प्रकारे समजू लागला आहे. तो कोरोना विरोधात नवे औषध तयार करण्यास अत्यंत उपयोगी ठरू शकतो," असे कॅनडामध्ये मॅकगिल विद्यापीठातील प्रोफेसर ब्रँट रिचर्ड्स यांनी म्हटले आहे.