Coronavirus : जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल स्वत: गेल्या होम क्वारंटाइनमध्ये, भेटलेल्या डॉक्टरला झाला होता संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 01:41 AM2020-03-24T01:41:09+5:302020-03-24T06:00:40+5:30
Coronavirus : रविवारी टीव्हीद्वारे देशाला उद्देशून भाषण केले होते. त्यानंतर त्यांना डॉक्टरला संसर्ग झाल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे त्यांनी होम क्वारंटाइनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
बर्लिन : जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल होम यांनी स्वत:हून होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. मर्केल यांना अलीकडेच एक डॉक्टर भेटले होते. त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे तपासणीत सिद्ध झाल्यानंतर अँजेला मर्केल यांनी स्वत: होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. त्या शुक्रवारपासून आहेत. अँजेला मर्केल यांना संसर्ग रोखणारे न्यूमोकोकल व्हॅक्सिन देण्यात आले आहे, अशी माहिती त्यांचे प्रवक्ते स्टीफन सिबरेट यांनी दिली. त्यांची ज्या डॉक्टरने भेट घेतली होती, त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आले. रविवारी टीव्हीद्वारे देशाला उद्देशून भाषण केले होते. त्यानंतर त्यांना डॉक्टरला संसर्ग झाल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे त्यांनी होम क्वारंटाइनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. स्टीफन सिबरेट यांनी सांगितले की, चॅन्सलर अँजेला मर्केल यांना पुढील काही दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येईल. त्यांना कोणीही भेटू शकणार नाही. त्यांच्या काही चाचण्या करण्यात येणार असून, या संपूर्ण काळात त्या आपल्या घरातूनच काम करणार आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन केल्याबद्दल मर्केल यांनी जनतेचे आभार मानले होते. तिथे आता दोनहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रत्येकाने दुसऱ्या व्यक्तीला भेटताना पाच फूट अंतर ठेवावे, असे सरकारने सांगितले आहे.
25
हजारांना संसर्ग
जर्मनीमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २५ हजारांवर गेली आहे. तसेच मृतांचा आकडा १००च्या आसपास असून, २५०हून अधिक लोक आजारातून बरे झाले आहेत, अशी माहिती तेथील सरकारने दिली आहे.