Coronavirus : बापरे! 'या' देशात रस्त्यावरच पडले मृतदेह, 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 06:07 PM2020-04-06T18:07:19+5:302020-04-06T18:13:53+5:30
Coronavirus : चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 69,768 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 69,768 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 12,74,022 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 2,64,833 लोक बरे झाले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 4000 वर पोहोचला आहे. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. कोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्कार करायलाच कोणी तयार नसल्याने रस्त्यावरच मृतदेह पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लॅटिन अमेरिका खंडातील इक्वाडोरमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. इक्वाडोरच्या गुआयरिलमधील नागरिकांमध्ये कोरोनाची प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचे मृतदेह रस्त्यावरच पडले असून ते उचलायला तसेच त्यावर अंत्यसंस्कार करायला कोणीच तयार नाही. कोरोनाच्या संसर्गामुळे इक्वाडोरमधील आरोग्य सेवेवरही विपरीत परिणाम झाला आहे. गुआयकिल शहरात सर्वाधिक लोकसंख्या आहे. या शहरातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाल्याची माहिती मिळत आहे.
Coronavirus : 'आम्हाला पैशांची समस्या नाही तर...', केजरीवालांनी दिलं गौतम गंभीरला उत्तरhttps://t.co/oJUXiftuCZ#CoronaUpdatesInIndia#ArvindKejriwal#GautamGambhir
— Lokmat (@MiLOKMAT) April 6, 2020
कोरोनाग्रस्तांसाठी देशातील रुग्णालयात बेडही नाहीत. तर दुसरीकडे मृतांची संख्या वाढल्याने शवागृह, स्मशानभूमीतही मृतदेह पडून आहेत. रस्त्याच्या एका बाजूला मृतदेह बेवारसपणे पडलेले आढळत आहेत. रस्त्यांवर मृतदेह पडून असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती देखील काही स्थानिकांनी व्यक्त केली आहे. मृतदेह ठेवण्यास जागा नसल्यामुळे अनेकजणांनी आपल्या घरांसमोरच मृतदेह ठेवले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून पेंट वॉर्निश प्यायले अन्... https://t.co/RDJPPbY0VB#coronavirus#CoronaUpdatesInIndia
— Lokmat (@MiLOKMAT) April 6, 2020
गुआयकिलमध्ये राहणाऱ्या फेरनांडो इस्पाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील पाच दिवसांपासून रस्त्यावर पडलेले मृतदेह कोणीतरी घेऊन जाईल याची आम्ही प्रतिक्षा करत आहोत. 911 क्रमांकावर याची तक्रार दिली. मात्र, प्रशासनाच्यावतीने कोणीही मृतदेह उचलण्यास आले नसल्याचे त्यांनी सांगितले. तर आम्ही आतापर्यंत 300 घरांतून मृतदेह उचलले आहेत. निधन झाल्यानंतर त्या रुग्णाचे कुटुंबीय मृतदेह रस्त्यावर आणून ठेवत आहेत. त्यानंतर काही तासानंतर हे मृतदेह उचलण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : 'आम्हाला पैशांची समस्या नाही तर...', केजरीवालांनी दिलं गौतम गंभीरला उत्तर
Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी पोलीस ठरले देवदूत
Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून पेंट वॉर्निश प्यायले अन्...
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचं 'आरोग्य सेतू' अॅप, 'त्या' व्यक्तींना करता येणार ट्रॅक
Coronavirus : प्रेरणादायी! ...म्हणून 6 महिन्यांच्या चिमुकलीला कुशीत घेऊन आई करतेय काम