Coronavirus : जगाला कोरोनाचा विळखा! तब्बल 3 अब्ज नागरिक लॉकडाऊन, 21,300 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 01:32 PM2020-03-26T13:32:39+5:302020-03-26T13:43:34+5:30
Coronavirus : कोरोना व्हायरसमळे अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
रोम/नवी दिल्ली – चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केलं आहे. कोरोनामुळे आतापर्यत 21,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 4,68,905 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 1,08,879 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 198 देशांत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर तब्बल तीन अब्ज नागरिक लॉकडाऊन असल्याची माहिती आता समोर आली आहे. जगातील अनेक देशात हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
कोरोना व्हायरसमळे अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. स्पेनमध्ये 738, इटलीत683 आणि फ्रान्समध्ये 231 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये चीनपेक्षाही जास्त मृ्त्यू झाले आहेत. स्पेनमध्ये आतापर्यंत 3647 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास अपयश आले आहे. इटलीत कोरोनाच्या संसर्गाने 7503 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 74 हजारहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. याच दरम्यान तब्बल 3 अब्ज लोक लॉकडाऊन आहेत.
Coronavirus : स्टेट बँकेच्या खातेधारकांसाठी खूशखबर! घरबसल्या मिळणार ‘ही’ सुविधा https://t.co/nhzZCLQwwJ#coronavirusindia#SBI
— Lokmat (@MiLOKMAT) March 26, 2020
फ्रान्समध्ये आतापर्यंत 25,233 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 465 जणांचा कोरोनाच्या बाधेमुळे मृत्यू झाला असून 9529 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही600 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग आफ्रिका खंडातही होत आहे. नायजर, कॅमेरून, इस्टोनिया आदी देशांमध्ये कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आफ्रिका खंडात 1800 जणांना करोनाचा संसर्ग झाला असून, त्यातील 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
#CoronaVirus जाणून घ्या महाराष्ट्रातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या....
— Lokmat (@MiLOKMAT) March 26, 2020
कोरोना व्हायरस संबंधित Latest Updates साठी क्लिक करा- -https://t.co/eUmVKtf2RI
.#CoronavirusLockdown#MaharashtraFightsCoronapic.twitter.com/roKdP388VK
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : स्टेट बँकेच्या खातेधारकांसाठी खूशखबर! घरबसल्या मिळणार ‘ही’ सुविधा
Coronavirus : डॉक्टरलाच झाली कोरोनाची लागण, 1000 रुग्णांना संसर्गाचा धोका
Coronavirus : बापरे! फक्त 20 मिनिटांत एका व्यक्तीमुळे 4 जणांना कोरोनाची लागण
Coronavirus : देशभरातल्या टोलनाक्यांवरील टोलवसुली स्थगित, नितीन गडकरींनी दिला मोठा दिलासा