CoronaVirus: हाहाकार! जगभरात कोरोनाचे बळी ३३००० पार; अमेरिकेत वेगवेगळे प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 11:13 PM2020-03-29T23:13:30+5:302020-03-29T23:14:23+5:30

जगभरात जवळपास १९० हून अधिक देशांना कोरोनाने विळखा घातला आहे. या देशांमध्ये 7,02,368 रुग्ण सापडले आहेत.

CoronaVirus: horrible! Corona virus death toll crossed 33000 mark hrb | CoronaVirus: हाहाकार! जगभरात कोरोनाचे बळी ३३००० पार; अमेरिकेत वेगवेगळे प्रयोग

CoronaVirus: हाहाकार! जगभरात कोरोनाचे बळी ३३००० पार; अमेरिकेत वेगवेगळे प्रयोग

Next

पॅरिस : जगभरात कोरोनाने जगभरात हाहाकार उडविला आहे. अमेरिकेनेही गुडघे टेकले असून तिथे रुग्णांची संख्या लाखावर गेली आहे. तर इटली आणि स्पेनमध्ये मृतांचा एका दिवसाचा आकडा हजाराच्या आसपास घुटमळत आहे. जगभरात आज कोरोनाच्या मृत्यूंच्या एकूण आकड्याने ३३००० संख्या पार केली आहे. 


जगभरात जवळपास १९० हून अधिक देशांना कोरोनाने विळखा घातला आहे. या देशांमध्ये 7,02,368 रुग्ण सापडले आहेत. तर 33,519 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150,732 रुग्ण बरे झाले आहेत. 
इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे पहिला मृत्यू फेब्रुवारीमध्ये झाला होता. आतापर्यंत येथील सरकारने 10,023 लोकांच्या मृत्यूचा आकडा स्पष्ट केला आहे. इटलीमध्ये 92,472 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यापैकी 12,384 लोक बरे झाले आहेत. मृत्यूच्या बाबतीत स्पेननेही इटलीनंतर चीनला मागे टाकले आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 6,528 लोक मरण पावले आहेत आणि 78,747 लोक संक्रमित झाले आहेत. स्पेनमध्ये गेल्या 24 तासात राजकन्येसह 838 लोक मरण पावले. यापूर्वी शनिवारी इटलीमध्ये सर्वाधिक ९७० मृत्यूमुखी पडले होते, जे एकाच दिवसातील सर्वाधिक मृत्यू आहेत. 

अमेरिकेत कोरोनावर उपचार करण्यासाठी वेगवेगळे  प्रयोग केले जात आहेत. ह्यूस्टनच्या एका मोठ्या रुग्णालयात कोविड -१९ पासून बरे झालेल्या रुग्णाचे रक्त या आजाराने ग्रासलेल्या एका रुग्णाला चढविण्यात आले आहे. प्राणघातक कोरोना विषाणूंपासून बरा झाल्यानंतर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चांगल्या स्थितीत राहिलेल्या व्यक्तीने रक्ताचा प्लाझ्मा दान केला आहे.  हा प्लाझ्मा ह्युस्टन मेथोडिस्ट हॉस्पिटलमधील 'कॉन्व्लेसेन्ट सीरम थेरपी' साठी दिला आहे. उपचाराची ही पद्धत 'स्पॅनिश फ्लू' साथीच्या आजारावेळी वापरण्यात आली होती. 

Web Title: CoronaVirus: horrible! Corona virus death toll crossed 33000 mark hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.