Coronavirus : खूशखबर! वैज्ञानिकांनी माकडांमध्ये विकसित केली कोरोनाशी लढण्याची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 08:46 AM2020-03-17T08:46:48+5:302020-03-17T08:49:24+5:30

चीनच्या वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत काही माकडांना कोरोना संक्रमित केलं होतं. या माकडांच्या शरीरात या रोगाशी लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती असल्याचं उघड झालं आहे. 

coronavirus infected monkeys developed immunity antibodies chinese scientist find vrd | Coronavirus : खूशखबर! वैज्ञानिकांनी माकडांमध्ये विकसित केली कोरोनाशी लढण्याची क्षमता

Coronavirus : खूशखबर! वैज्ञानिकांनी माकडांमध्ये विकसित केली कोरोनाशी लढण्याची क्षमता

Next
ठळक मुद्देचीनच्या वुहानमधून पूर्ण जगात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या कारणास्तव 170,740 जण संक्रमित झाले आहेत. तर आतापर्यंत 6687 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. चीनच्या वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत काही माकडांना कोरोना संक्रमित केलं होतं. या माकडांच्या शरीरात या रोगाशी लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती असल्याचं उघड झालं आहे. 

बीजिंगः कोरोनानं पूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. चीनच्या वुहानमधून पूर्ण जगात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या कारणास्तव 170,740 जण संक्रमित झाले आहेत. तर आतापर्यंत 6687 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. परंतु कोणत्याही देशाला या रोगावर निश्चित अशी लस विकसित करण्यात आलेली नाही. चीनच्या वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत काही माकडांना कोरोना संक्रमित केलं होतं. या माकडांच्या शरीरात या रोगाशी लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती असल्याचं उघड झालं आहे. 

माकडांमध्ये या रोगाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती विकसित करण्याचा अर्थ मनुष्याचीही रोगप्रतिकारक क्षमता वाढवता येऊ शकतो. म्हणजेच आता या माकडांच्या शरीरातून अँटीबॉडी घेऊन नवीन लस तयार केल्या जाऊ शकतात. अँटीबॉडी हे आपल्या शरीरातील बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढत असतात. आजाराशी लढून कोणत्याही संक्रमणापासून आपल्याला वाचवतात. 
चीनचे वैज्ञानिक आता माकडांमधील अँटीबॉडीज घेऊन महिन्याभरात त्याचा माणसांवर प्रयोग करणार आहेत. तसेच ज्या लोकांची कोरोना रोगातून मुक्तता झालेली आहे, त्यांच्या अँटीबॉडीज घेऊन चीन लस बनवणार आहे.

चीनमधील 75 हजारांहून अधिक लोक कोरोना विषाणूंपासून मुक्त झालेले आहेत. म्हणजेच ते ठीकठाक झाले आहेत. आता त्यांच्या शरीरातून अँटीबॉडीज घेऊन ही लस विकसित केली जाईल. तसेच माकडांचे अँटीबॉडीज आणि या रोगातून मुक्त झालेल्याचे अँटीबॉडीजचं मिश्रण करूनही चीन एक लस विकसित करणार आहे. 

Web Title: coronavirus infected monkeys developed immunity antibodies chinese scientist find vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.