Coronavirus: ISIS बरळली; म्हणाली, 'मूर्तीपूजा करणाऱ्या देशांना अल्लाने उत्तर दिले'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 06:40 PM2020-03-24T18:40:47+5:302020-03-24T18:41:27+5:30
इसिसने अल्लाकडे नास्तिकांना कोराना व्हायरसचा कहर आणखी होऊदे असे आवाहन केले आहे.
लंडन : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिसने जगभरात कोरोना व्हायरस पसरल्यामुळे त्यांच्या दहशतवाद्यांना कुणाला हात लावू नका, हात उघडे ठेवू नका, तोंड झाका असे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर आज मूर्तीपूजक देशांना अल्लाने चांगलाच धडा शिकविला असल्याचे इसिस बरळली आहे.
महत्वाचे म्हणजे पाकिस्तान, इराण, सौदी अरेबिया सारख्या मुस्लिमबहुल देशांनाही कोरोनाने ग्रासले आहे. अशावेळी इसिसने अल्लाकडे नास्तिकांना कोराना व्हायरसचा कहर आणखी होऊदे असे आवाहन केले आहे. कोरोनामुळे युद्धखोरी करणाऱ्या देशांना मागे हटण्यासाठी भाग पडल्याचेही इसिसने म्हटले आहे.
इस्लामिक स्टेटने एक न्यूज लेटर काढत म्हटले आहे की, अल्लाने स्वत: निर्माण केलेल्या देशांमध्ये खूप मोठे संकट आणले आहे. हा मूर्तीपूजा करणाऱ्या देशांना कठोर इशारा आहे. अल्लाने त्याला मानणाऱ्या देशांचे संरक्षण करावे आणि नास्तिक देशांवर कोरोनाला पसरवावे असे म्हटले आहे.
अल्लाने त्याच्या विरोधात विद्रोह करणाऱ्यांना दंड द्यावा आणि जे त्याचे ऐकतात त्यांना वाचवावे. अल्लाने कोरानाची महामारी पसरवून आक्रमण करणाऱ्या देशांना त्यांचे लष्कर मागे घ्यायला लावले आहे, असेही इसिस बरळली आहे.