Coronavirus : उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, किम जोंग उन यांचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 02:19 PM2020-03-18T14:19:57+5:302020-03-18T14:22:48+5:30

Coronavirus: चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील अनेक देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे.

Coronavirus kim jong un said corona is not in north korea the world is surprised SSS | Coronavirus : उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, किम जोंग उन यांचा अजब दावा

Coronavirus : उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, किम जोंग उन यांचा अजब दावा

googlenewsNext
ठळक मुद्देचीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील अनेक देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण नाही असा अजब दावा किम जोंग उन यांनी केला आहे. उत्तर कोरियाने केलेल्या या अजब दाव्यामुळे सर्वच जण हैराण झाले आहेत.

प्‍योंगयांग - कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत 7500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोकांना संसर्ग झाला आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील अनेक देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा किरकोळ बाबींसाठी क्रूर शिक्षा सुनावण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. दरम्यान, किम जोंग उनच्या क्रौर्याची अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यावर त्याच्यावर उपचार करण्याऐवजी किम जोंग यांनी त्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. मात्र आता त्यांनी उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण नाही असा अजब दावा केला आहे. 

कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मात्र उत्तर कोरियाने केलेल्या या अजब दाव्यामुळे सर्वच जण हैराण झाले आहेत. उत्तर कोरियात एकाही कोरोना बाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. किम जोंग उन यांनी कोरोनाचा प्रसार होण्यासाठी जानेवारीमध्येच देशाची सीमा बंद केली होती, शिवाय व्यापार आणि पर्यटनावर आधीच नियंत्रण आणले होते अशी माहिती मिळत आहे. मात्र हे असंभव असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच उत्तर कोरिया रुग्णांची माहिती लपवत असल्याचं देखील म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी इंटरनॅशनल बिझनेस टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, किम जोंग यांनी कोरोना रुग्णाला गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. कोरोना व्हायरस हा उत्तर कोरियामध्ये पसरू नये यासाठी त्याला थेट गोळ्या घाला असा आदेश किम जोंग यांनी दिला. उत्तर कोरियातील एक व्यक्ती कामानिमित्त चीनमध्ये गेली होती. त्यावेळी तिथे त्याला कोरोनाची लागण झाली. काही दिवसांपूर्वी ही व्यक्ती चीनमध्ये परतली. या व्यक्तीमुळे इतर लोकांमध्ये त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले होते. 

जगभरात कोरोना वेगाने पसरत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 7500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र याच दरम्यान करण्यात आलेल्या एक संशोधनातून अमेरिका आणि ब्रिटनची चिंता वाढली आहे. कोरोनामुळे अमेरिकेत 22 लाख तर ब्रिटनमध्ये 5 लाख लोकांचा मृत्यू होणार असल्याची भीती ही संशोधन अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये या अहवालानंतर पंतप्रधान बोरिस जोहान्सन यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी आणखी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. ब्रिटनची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विविध आजार असलेल्या नागरिकांना वेगळे ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लंडन येथील प्राध्यापक नील फर्ग्युसन यांनी इटलीतील परिस्थितीच्या आधारे हे संशोधन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus: बापरे! ...तर कोरोनामुळे अमेरिका, ब्रिटनमध्ये 27 लाख लोकांचा मृत्यू होणार?

Coronavirus : ...म्हणून गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र, शेणाला मिळतोय इतका भाव

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला! देशातील रुग्णांची संख्या 147

Coronavirus: एकूण 4 टप्पे! भारतात कोणत्या टप्प्यात आहे 'कोरोना'?, जाणून घ्या  

Coronavirus: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 42वर, पुण्यात आढळला आणखी एक रुग्ण 

 

Web Title: Coronavirus kim jong un said corona is not in north korea the world is surprised SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.