coronavirus: वेगवेगळ्या डिजिटल कट्ट्यांवर लाईव्ह रंगले संमेलन; सदस्य उत्साहाने झाले सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 01:56 AM2020-05-10T01:56:58+5:302020-05-10T01:57:03+5:30

टोरोंटोच्या स्थानिक वेळेनुसार शनिवारी (९ मे) संध्याकाळी हे उत्तर-अमेरिका मराठी साहित्य संमेलन वेगवेगळ्या डिजिटल कट्ट्यांवर लाईव्ह रंगले आणि भारतात रविवारच्या पहाटे दीड वाजल्यापासून ते ‘लाईव्ह’ दिसलेही.

coronavirus: live colored assemblies on different digital platforms; Members enthusiastically participated | coronavirus: वेगवेगळ्या डिजिटल कट्ट्यांवर लाईव्ह रंगले संमेलन; सदस्य उत्साहाने झाले सहभागी

coronavirus: वेगवेगळ्या डिजिटल कट्ट्यांवर लाईव्ह रंगले संमेलन; सदस्य उत्साहाने झाले सहभागी

Next

टोरोंटो : कोरोनाच्या जागतिक उत्पाताने जगभरातील लोकांना ‘शारीरिक दुरावा’ सक्तीचा केल्याने आता येत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काय, असा प्रश्न हळूहळू मराठी साहित्य क्षेत्रात मान वर काढत असताना तिकडे पंधरा हजार मैलावरच्या कॅनडातल्या टोरोंटोमध्ये मात्र मराठी मंडळींनी ‘३२ व्या टोरोंटो साहित्य संमेलना’चा डिजिटल मांडव हौसेने आणि कष्टाने सजवला.

टोरोंटोच्या स्थानिक वेळेनुसार शनिवारी (९ मे) संध्याकाळी हे उत्तर-अमेरिका मराठी साहित्य संमेलन वेगवेगळ्या डिजिटल कट्ट्यांवर लाईव्ह रंगले आणि भारतात रविवारच्या पहाटे दीड वाजल्यापासून ते ‘लाईव्ह’ दिसलेही.
खरेतर कोविडने सगळ्यांनाच आता चार भिंतीत कोंडून घातल्याने ‘आॅनलाईन’ मिटिंगांपासून गाणी-नृत्ये आणि अगदी वाढदिवसांच्या कैण्डल लाईट डिनर्सपर्यंत सगळेच ‘व्हर्चुअल’ होते आहे, त्यामुळे साहित्य संमेलन ‘डिजिटल’ होण्यात नवीन ते काय?
टोरोंटो साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य असे, की गेल्या बत्तीस वर्षांची उन्हाळी आयोजनाची परंपरा जपणारा हा कॅनडातला मराठी कार्यक्रम कात टाकून ‘न्यू नॉर्मल’चे स्वागत करण्यास तयार झाला आणि जुने-जाणते सदस्यही नव्या रीती शिकून घेऊन त्यात उत्साहाने सहभागी झाले. काही टेक सॅव्ही ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:हून बाकीच्यांना डिजिटल कट्टे लाईव्ह कसे वापरावेत, हे शिकवण्याची जबाबदारी घेतली. या संमेलनासाठी मधुसूदन भिडे, टोरोण्टो मराठी भाषक मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ सरनोबत, सेक्रेटरी वृणाल देवळे, खजिनदार राज गावडे, संमेलनाच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य गायत्री गद्रे, निषाद सोमण, अनिल विंगळे, संगणक तज्ञ रोहन भाजेकर, सोशल मीडिया टीम हिरणमय कोपरकर, दुर्गेश खटावकर आणि अमेय गोखले यांचे मुख्य योगदान आहे.

दीर्घ परंपरा
उत्तर अमेरिकेतील हे पहिले मराठी साहित्य संमेलन, मधुसूदन भिडे यांनी ३२ वर्षांपूर्वी, टोरोंटो मध्ये सुरू केले. गेली ३१ वर्षे सातत्याने दरवर्षी मार्च/एप्रिल महिन्यांत या संमेलनाचे आयोजन केले जाते. या वर्षीचे संमेलन ४ एप्रिलला ठरले होते, पण कोरोनामुळे ते अर्थातच रद्द करावे लागले; मग उपाय निघाला ‘डिजिटली’ एकत्र जमण्याचा! हे उत्तर अमेरिकेतील पहिले आॅनलाईन मराठी साहित्य संमेलन ठरले.

‘डिजिटल’ मराठी आधार
‘परदेशात राहताना आधीच एकलकोंडे आयुष्य असते, त्यात आता कोरोनाने लादलेला सक्तीचा एकांतवास.  गेल्या ३-४ वर्षांत टोरोंटोमध्ये येणाऱ्या मराठी लोकांची संख्या खूप वाढली आहे. कॅनडामध्ये नवीन आलेल्या लोकांसाठी हे वातावरण अधिकच आव्हानात्मक आहे. अशा वेळेस मानसिक आधार खूप महत्त्वाचा असतो. तो या डिजिटल संमेलनामार्फत देण्याचा आम्ही प्रयत्न केला! - श्रीनाथ सरनोबत,
अध्यक्ष, टोरोंटो मराठी भाषिक मंडळ

सहभागी व्हा... हे साहित्य संमेलन फेसबुकवर लाईव्ह झाले होते.  

Web Title: coronavirus: live colored assemblies on different digital platforms; Members enthusiastically participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.