CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! तब्बल 40 लाखांहून अधिक चिमुकल्यांना कोरोनाची लागण; रिसर्चमधून दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 12:45 PM2021-07-23T12:45:20+5:302021-07-23T13:00:17+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: अमेरिकेत लहान मुलांची कोरोना बाधित होण्याची संख्या 14.2 टक्के एवढी आहे. रुग्णालयात भरती केलेल्या रुग्णांमध्ये 1.3 ते 3.6 टक्के रुग्ण लहान मुलं आहेत.
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 18 कोटींवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेसारखे अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. कोरोनावर विविध ठिकाणी संशोधन सुरू असून संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. यातच लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स (AAP) आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशनच्या नव्या रिपोर्टमध्ये गेल्या वर्षभरात एकूण 40 लाखांहून अधिक मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचं म्हटलं आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स (AAP) आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशनच्या रिपोर्टनुसार, 15 जुलैपर्यंत सुमारे 40.09 लाख मुलांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या आठवड्यात 23,500 हून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.
Corona Vaccine : कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 5 तासांत चेहऱ्याच्या एका बाजुला मारला लकवा, घटनेने खळबळ#coronavirus#CoronavirusPandemic#Corona#CoronaVaccine#coronavaccinationhttps://t.co/zMGBGt13VR
— Lokmat (@MiLOKMAT) July 21, 2021
अमेरिकेत लहान मुलांची कोरोना बाधित होण्याची संख्या 14.2 टक्के एवढी आहे. रुग्णालयात भरती केलेल्या रुग्णांमध्ये 1.3 ते 3.6 टक्के रुग्ण लहान मुलं आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या लहान मुलांचा मृत्युदर 0 ते 0.26 टक्के एवढा आहे. कोरोना व्हायरसमुळे लाखो लहान मुलं अनाथ झाले आहेत. एका वृत्तानुसार, आत्तापर्यंत जगातील 21 देशांमध्ये 15.62 लाख मुलांनी आपले आई किंवा वडील किंवा दोघांनाही गमावले आहेत. यापैकी 1,16,263 मुले ही भारतातील आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : देशातील कोरोना रुग्णांची संख्या 3 कोटींवर; 4 लाख लोकांनी गमावला जीव#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#Kerala#Maharashtrahttps://t.co/Kt6f2ccxLz
— Lokmat (@MiLOKMAT) July 21, 2021
बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर मारला 'लकवा', डोळा बंद करताना होतोय त्रास; 'या' देशात भीतीचे वातावरण
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय हे केले जात आहेत. याच दरम्यान काही ठिकाणी कोरोना लसीचे साईड इफेक्ट देखील समोर आले आहेत. कोरोनाची लस घेतल्यानंतर काही लोकांना त्रास जाणवू लागला आहे. ताप येणं, स्नायूंमध्ये वेदना, लस घेतलेल्या भागाला सूज आणि वेदना, अशक्तपणा अशी लक्षणं दिसू लागतात. तर काहींना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. कोरोना लसीच्या साईड इफेक्टची एक गंभीर घटना आता समोर आली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या एका व्यक्तीला अर्धांगवायूचा झटका आला आहे. ब्रिटनमध्ये ही घटना घडली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमधील एका 61 वर्षीय व्यक्तीने कोरोनावरील फायझरची (Pfizer Vaccine) लस घेतली होती. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्यांची तब्येत थोडी बिघडत होती. मात्र दुसऱ्या डोसनंतर प्रकृती अचानक आणखी खालावली आहे.
CoronaVirus Live Updates : कोरोना लसीकरणासाठी काय पण! वैद्यकिय क्षेत्रातील लोक करताहेत अहोरात्र काम #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronaVaccine#coronavaccinationhttps://t.co/EetYDurQUr
— Lokmat (@MiLOKMAT) July 20, 2021