CoronaVirus Live Updates : बापरे! आता ड्रॅगन फ्रूटमध्ये आढळला कोरोना व्हायरस; 'या' देशातील अनेक सुपरमार्केट बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 05:32 PM2022-01-06T17:32:57+5:302022-01-06T17:43:57+5:30

CoronaVirus And Dragon Fruit : 9 शहरांमध्ये फळांचा तपास करण्यात आला. यात कोरोना व्हायरस आढळून आला आहे.

CoronaVirus Live Updates corona virus found in dragon fruit in china many supermarkets closed | CoronaVirus Live Updates : बापरे! आता ड्रॅगन फ्रूटमध्ये आढळला कोरोना व्हायरस; 'या' देशातील अनेक सुपरमार्केट बंद

CoronaVirus Live Updates : बापरे! आता ड्रॅगन फ्रूटमध्ये आढळला कोरोना व्हायरस; 'या' देशातील अनेक सुपरमार्केट बंद

Next

कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 29 कोटींचा टप्पा पार केला आहे. अनेक प्रगत देश कोरोना व्हायरसपुढे हतबल झाले आहेत. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 298,423,860 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5,484,358 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 256,941,283 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याच दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये (Dragon Fruit) कोरोना व्हायरस आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

चीनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. रिपोर्टनुसार, चीनमध्ये व्हिएतनाममधून आलेल्या ड्रॅगन फ्रूटमध्ये कोरोना व्हायरस असल्याचा मोठा खुलासा झाला आहे. यानंतर प्रशासनाने देशभरातील अनेक सुपरमार्केट बंद केले आहेत. मात्र खाद्यपदार्थांमधून कोरोनाचा प्रसार होत असल्याचे पुरावे अद्याप हाती आलेले नाहीत. झेजियांग आणि जियांग्शी प्रांतातील 9 शहरांमध्ये फळांचा तपास करण्यात आला. यात कोरोना व्हायरस आढळून आला आहे. यानंतर परदेशातून येणाऱ्या खाण्या-पिण्याच्या पदार्थांचा तपास सुरू केला आहे. 

फळ खरेदी करणाऱ्यांना क्वारंटाईन होण्याचे आदेश

फळ खरेदी करणाऱ्यांना क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चीनमध्ये डिसेंबर 2020 मध्ये देखील व्हिएतनाममधून आलेले ड्रॅगन फ्रूटमध्ये कोरोना व्हायरल आढळला होता. यानंतर 26 जानेवारी 2021 पर्यंत याच्या आयातीवर निर्बंध लावण्यात आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनमधील अनेक शहरांमध्ये कठोर निर्बंध लागू करत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. चीनमधील एका शहरात कोरोनाचे फक्त तीन रुग्ण आढळले म्हणून जवळपास 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात लॉकडाऊन केलं आहे. या तिन्ही रुग्णांना कोणतीही लक्षणं पाहायला मिळत नाहीत.

फक्त 3 रुग्ण आढळले म्हणून चीनने 10 लाख लोकसंख्येच्या शहरात केलं लॉकडाऊन

चीनच्या यूझूमध्ये पूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. शहरातील सर्व नागरिकांना कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी घराबाहेर न पडण्याची सूचना करण्यात आली आहे. या शहराची लोकसंख्या 10 लाखांहून अधिक आहे. गेल्या काही दिवसांत येथे तीन रुग्ण आढळल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आणि उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनादेखील करण्यात आल्या आहेत. शहरात आधीच बस आणि टॅक्सी सेवा बंद करण्यात येत असल्याची तसेच शॉपिंग मॉल्स, म्युझियम आणि पर्यटनस्थळं बंद करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. चीनमध्ये सोमवारी 175 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
 

Web Title: CoronaVirus Live Updates corona virus found in dragon fruit in china many supermarkets closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.