CoronaVirus Live Updates : अरे व्वा! संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा मात्र 'या' देशात नाही एकही रुग्ण; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 02:21 PM2022-02-24T14:21:41+5:302022-02-24T14:36:02+5:30

CoronaVirus Live Updates : कोरोनाने गेल्या दोन वर्षांत जगभरात हाहाकार माजवला आहे. त्याच वेळी, असे काही आनंदी देश आहेत जे दावा करतात की त्यांच्या देशात एकही कोरोना केस नाही.

CoronaVirus Live Updates countries who reported zero covid case as per un | CoronaVirus Live Updates : अरे व्वा! संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा मात्र 'या' देशात नाही एकही रुग्ण; 'हे' आहे कारण

CoronaVirus Live Updates : अरे व्वा! संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा मात्र 'या' देशात नाही एकही रुग्ण; 'हे' आहे कारण

Next

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 42 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. कोरोनाने गेल्या दोन वर्षांत जगभरात हाहाकार माजवला आहे. त्याच वेळी, असे काही आनंदी देश आहेत जे दावा करतात की त्यांच्या देशात एकही कोरोना केस नाही. या देशांमध्ये कोरोना न पोहोचण्याची वेगवेगळी कारणे समोर आली आहेत. तथापि, या देशांमध्ये फ्लूच्या काही प्रकरणांवर लक्ष ठेवले जात आहे. 

2020 मध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर, शून्य कोविड प्रकरणांच्या यादीतील देशांची नावे कमी जास्त होत आहेत. ताज्या अहवालानुसार चार देशांमध्ये एकही कोरोना केस समोर आलेली नाही. कोरोना कधी संपेल याचे उत्तर शास्त्रज्ञ अजून देऊ शकलेले नाहीत. त्याचा नेमका कसा उगम झाला याची देखील अचूक माहिती नाही. या व्हायरसमुळे 2 वर्षांत संपूर्ण जग बदलले. परंतु काही देश दावा करत आहेत की त्यांच्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, तुर्कमेनिस्तान (Turkmenistan), तुवालू (Tuvalu), नाउरु (Nauru) आणि उत्तर कोरिया (North Korea) या चार देशांचा यामध्ये समावेश आहे. 

तुर्कमेनिस्तान

तुर्कमेनिस्तानने कोरोना न पोहोचण्याचे कारण सांगितलं आहे. या देशाच्या बहुतांश सीमा व्हायरस पसरण्याच्या एक महिन्यापूर्वीच बंद करण्यात आल्या होत्या. तसेच अनेक उड्डाणेही रद्द करण्यात आली. या देशात 'कोरोना व्हायरस' या शब्दावरही बंदी घालण्यात आली असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र हे वृत्त खोटे ठरले.

उत्तर कोरिया

उत्तर कोरियानेही झीरो कोविड केस असल्याचा दावा केला आहे. रिपोर्ट्सनुसार, कोरोनानंतर आपल्या सीमा बंद करणारा हा पहिला देश होता. 21 जानेवारीपासून उत्तर कोरियाच्या सीमा बंद करण्यात आल्या असून आतापर्यंत कडक निर्बंध आहेत.

तुवालू

तुवालू हा एक देश आहे जिथे खूप कमी लोक जातात. असे मानले जाते की कमी लोकसंख्या आणि पर्यटकांची कमी संख्या हे कोरोनाचा प्रसार न होण्याचं कारण आहे.

नाउरू

नाउरूची लोकसंख्या कमी आहे. हे एक लहान बेट आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, येथे 100 पैकी 68 जणांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. 2017 मध्ये येथे फक्त 130 लोक आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: CoronaVirus Live Updates countries who reported zero covid case as per un

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.