CoronaVirus Live Updates : भयावह! कोरोना मृतांची खरी आकडेवारी भलतीच; 60 ते 80 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता, WHOचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 10:28 PM2021-05-21T22:28:37+5:302021-05-21T22:45:57+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. कोरोना महामारीत होणाऱ्या सर्वच मृत्यूंची नोंद झालेली नाही असं म्हटलं आहे.
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. जगात कोरोनाच्या रुग्णसंख्येने तब्बल 16 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्णाण झाले आहे. अनेक देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. कोरोना महामारीत होणाऱ्या सर्वच मृत्यूंची नोंद झालेली नाही असं म्हटलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने सरकारी आकडेवारीनुसार जे आकडे आपल्यासमोर येत आहेत त्यापेक्षा खूप जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. WHO म्हणण्यानुसार आतापर्यंत 60 ते 80 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, आत्तापर्यंत अधिकृत जगात 34.46 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. वार्षिक ग्लोबल हेल्थ स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट जारी करताना जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, कोरोनामुळे वर्ष 2020 मध्येच जवळपास 30 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जगातील विविध देशांनी केलेल्या नोंदीनुसार ही आकडेवारी 12 लाखाच्या आसपास आहे.
CoronaVirus Live Updates : कोरोनावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसायक्लिन या गोळ्यांची दोन कोटींहून अधिक विक्री #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#Paracetamolhttps://t.co/tkxrZZSfCE
— Lokmat (@MiLOKMAT) May 21, 2021
कोरोनामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे. मात्र, या सर्वच आकडेवारीची आपल्याकडे नोंद झालेली नाही. अनेक ठिकाणाहून समोर येणारे आकडे प्रत्यक्षात खूप मोठे असल्याची भीती आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. मे 2021 पर्यंत कोरोनामुळं 34 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र ही सरकारी आकडेवारी असून खरी संख्या दोन ते तीन पट अधिक असण्याची दाट शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या असिस्टट डायरेक्टर-जनरल (डेटा आणि एनालिटिक्स विभाग) समीरा आसमा यांनी सांगितले आहे.
CoronaVirus Live Updates : धक्कादायक! कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे केली जातेय 25 हजार ते 70 हजारांची मागणी#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/YYd3QWelep
— Lokmat (@MiLOKMAT) May 21, 2021
"आपल्याला दिसत असलेल्या आकडेवारीपेक्षा खरे आकडे दोन ते तीन पट अधिक आहेत. त्यामुळं माझ्या मते आत्तापर्यंत 60 ते 80 लाख लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. दुसऱ्या आणि पहिल्या महामारीतही अनेक ठिकाणी रुग्णांना दवाखाने आणि खाट उपलब्ध होऊ शकत नव्हते, तेवढी आरोग्य व्यवस्थाच नव्हती. त्यावेळी नोंदीपेक्षा अधिक मृत्यू झाले असावेत" असं म्हटलं आहे. WHO चे डेटा एनालिस्ट विलियम मेसेम्बूरी यांनीही आसमा यांच्या मताला दुजोरा दिला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात विविध उपाय केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : फक्त 14 टक्के लोक हे मास्क नीट लावतात, बाकीचे...; रिसर्चमधून खुलासा#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#Maskhttps://t.co/B1naUlHKZW
— Lokmat (@MiLOKMAT) May 20, 2021
CoronaVirus Live Updates : बापरे! 'ते' रेमडेसिवीर चोरायचे आणि त्याऐवजी...; पोलीस तपासात धक्कादायक प्रकार उघड#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#Remdisivir#RemdesivirBlackMarketing#remdesivirinjectionhttps://t.co/z02btfky5d
— Lokmat (@MiLOKMAT) May 20, 2021