CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवशी तब्बल 929 लोकांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 05:09 PM2021-10-06T17:09:15+5:302021-10-06T17:16:03+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसच्या टास्क फोर्सने बुधवारी एका दिवसात 929 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

CoronaVirus Live Updates for the first time in russia more than 900 people died of corona virus in day | CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवशी तब्बल 929 लोकांनी गमावला जीव

CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवशी तब्बल 929 लोकांनी गमावला जीव

googlenewsNext

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 23 कोटींवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. काही देशांत पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान रशियामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे पहिल्यांदाच एका दिवसात तब्बल 900 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

रशियामध्ये कोरोना व्हायरसच्या टास्क फोर्सने बुधवारी एका दिवसात 929 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. याआधी मंगळवारी 895 लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. तसेच टास्क फोर्सने बुधवारी कोरोनाचे 25,133 नवे रुग्ण आढळून आल्याचं सांगितलं आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रशियामध्ये कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील खूप कमी लोकांनी आतापर्यंत कोरोना लस घेण्याचा आरोप क्रेमलिनने केला आहे. लसीकरणाचा वेग मंदावल्यानेच रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

14.6 कोटी लोकांपैकी 33 टक्के लोकांनी घेतली लस

मंगळवारपर्यंत रशियातील 14.6 कोटी लोकांपैकी जवळपास 33 टक्के लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाच संसर्ग रोखण्यासाठी जगभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. कोरोना व्हायरसची माहिती लपवण्याचा आरोप हा वारंवार चीनवर करण्यात येत आहे. याच दरम्यान अनेक देशांनी प्रश्न देखील उपस्थित केले. याच दरम्यान एका सायबर सिक्योरिटी कंपनीच्या रिसर्चमधून मोठा दावा करण्यात आला आहे. WHO ला कोरोनाची माहिती देण्याआधीच केली चीनने टेस्ट किटची खरेदी केल्याचं समोर आलं आहे.

चीनचा खोटारडेपणा उघड! "WHO ला कोरोनाची माहिती देण्याआधीच केली होती टेस्ट किटची खरेदी"

जागतिक आरोग्य संघटनेला कोरोना व्हायरसची माहिती देण्यापूर्वी कित्येक महिने आधी कोरोना टेस्ट किटची खरेदी केली होती अशी धक्कादायक आता माहिती समोर आली आहे. रिसर्चनुसार, चीनी सरकारने कोरोना आजार जाहीर केल्याच्या काही महिन्यांपूर्वी देशातील हुबेई प्रांतात करोना चाचण्यांवरील खर्च वाढवला होता. हुबेई प्रांतातील वुहान शहरात कोरोना व्हायरसचे पहिली प्रकरण नोंदवले गेले होते. जागतिक आरोग्य संघटनेला चीनने 31 डिसेंबर 2019 मध्ये शहरात अज्ञात कारणामुळे न्यूमोनियाची प्रकरणे आढळली आहेत असे कळवले होते. 7 जानेवारी 2020 रोजी, चिनी अधिकाऱ्यांनी एक नवीन प्रकारचा कोरोनाव्हायरसची माहिती देत त्याला SARS-CoV-२ म्हणून ओळखले जाईल असं म्हटलं होतं. त्यानंतर कोरोना हा जवळजवळ जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरला आहे आणि 230 मिलियन अधिक लोकांना संसर्ग झाला आहे आणि जवळपास 48 लाख लोकांचा मृत्यू झाला.
 

Web Title: CoronaVirus Live Updates for the first time in russia more than 900 people died of corona virus in day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.