CoronaVirus Live Updates : श्वास घेण्यास त्रास, थकवा... वर्षभरानंतरही कोरोना पाठ सोडेना; बरं झाल्यानंतर आढळताहेत 'ही' लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 12:44 PM2021-08-29T12:44:11+5:302021-08-29T12:45:25+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या वाढत्या संख्येने तज्ज्ञांच्या चिंतेत भर पडली आहे.
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने 21 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाने आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या वाढत्या संख्येने तज्ज्ञांच्या चिंतेत भर पडली आहे. वर्षभरानंतरही कोरोना पाठ सोडत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनातून बरं झाल्यावर देखील रुग्णांमध्ये लक्षणं आढळून आली आहेत. आरोग्य विषयक अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. लँसेट जनरलच्या रिसर्चमधून ही माहिती समोर आली आहे.
रिपोर्टनुसार, कोरोना संक्रमित झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक लोकांमध्ये 12 महिन्यांनंतर देखील कोरोनाची काही लक्षणं आढळून येत आहेत. न्यूज एजन्सीनुसार, चीनच्या वुहानमध्ये 1276 रुग्णांवर हा रिसर्च करण्यात आला आहे. यामध्ये तीन पैकी एका व्यक्तीला 12 महिन्यांनंतर देखील श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला आहे. तर काही लोकांच्या फुफ्फुसाच्या तक्रारी आहे. ज्यांना कोरोनाचा अधिक संसर्ग झाला होता. त्यांना जास्त त्रास जाणवत आहे. तर अनेकांना थकवा जाणवू लागला आहे.
CoronaVirus Live Updates : भीषण! कोरोना मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने शवगृहात जागाच शिल्लक नाही....#CoronavirusUpdates#coronavirus#Americahttps://t.co/INgZsiHWt5
— Lokmat (@MiLOKMAT) August 29, 2021
चीन-जपानच्या फ्रेंडशिप हॉस्पिटलचे प्रोफेसर बिन काओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये होणाऱ्या बदलांबाबत आमची रिसर्च टीम सर्वात मोठा रिसर्च करत आहे. रिसर्चमध्ये काही रुग्णांना बरं होण्यासाठी एका वर्षापेक्षा अधिक काळ लागत असल्याचं म्हटलं आहे. कोरोनातून ठीक झाल्यानंतर सहा महिन्यांनी 68 टक्के रुग्णांमध्ये कमीत कमी एक लक्षण आढळून येत आहे. सर्वाधिक रुग्णांना थकवा जाणवत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. जगभरात यावर संशोधन सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : डेल्टा व्हेरिएंटचा कहर, प्रशासनाच्या चिंतेत भर; रिसर्चमधून धडकी भरवणारी माहिती आली समोर#CoronavirusUpdates#CoronavirusPandemic#DeltaVarianthttps://t.co/vdsU6yauAI
— Lokmat (@MiLOKMAT) August 23, 2021
कोरोनाचा उद्रेक! अमेरिकेत दररोज 1 लाख नवे रुग्ण; शवागृहात मृतदेहांचा खच, परिस्थिती गंभीर
अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटीचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत आता पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. एका दिवसात कोरोनाचे तब्बल 1 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढली आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा हे कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. न्यूज एजन्सी एपीच्या रिपोर्टनुसार, मध्य फ्लोरिडामध्ये कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे रुग्णालयाच्या शवागृहात मृतदेहांसाठी जागाच शिल्लक नाही. शवागृहात मृतदेहांचा खच पाहायला मिळत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फ्लोरिडामध्ये सर्वाधिक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रांतात सध्या 17 हजारांहून अधिक रुग्ण भरती आहेत.
CoronaVirus Live Updates : बापरे! एक आठवडा सुरू असलेल्या 'सेक्स फेस्टिवल'मुळे 100 जणांना कोरोनाची लागण; स्थानिक संतप्त#coronavirus#Corona#CoronavirusPandemichttps://t.co/JlPR7XRx1Y
— Lokmat (@MiLOKMAT) August 23, 2021