CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! दर 2 मिनिटाला 'या' देशात होतोय एकाचा मृत्यू; लसीचाही मोठा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 02:33 PM2021-08-10T14:33:45+5:302021-08-10T14:40:12+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा कहर वाढण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचं पालन न करणं आणि मास्क न लावणे या गोष्टींना जबाबदार धरलं आहे.

CoronaVirus Live Updates iran in deep crisis due to coronavirus one person dies in every two minutes | CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! दर 2 मिनिटाला 'या' देशात होतोय एकाचा मृत्यू; लसीचाही मोठा तुटवडा

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! दर 2 मिनिटाला 'या' देशात होतोय एकाचा मृत्यू; लसीचाही मोठा तुटवडा

Next

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 20 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान काही देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दर 2 मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. तर कोरोना लसीचा देखील मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इराण सरकारनेच याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी कोरोनामुळे 588 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

इराणच्या प्रशासनाने कोरोनाचा कहर वाढण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचं पालन न करणं आणि मास्क न लावणे या गोष्टींना जबाबदार धरलं आहे. देशातील अनेक शहरांतील रुग्णालयामध्ये बेडची मोठी कमतरता आहे. सोशल मीडियावर लोक सरकार आणि लसीकरण यावरून जोरदार निशाणा साधत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत इराणमध्ये 94603 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसांत 40 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. इराणच्या सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, दर 2 सेकंदाला एका व्यक्तीला कोरोनाची लागण होत आहे. तर दर दोन मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे. 

इराणच्या 31 प्रांतामधील अनेक भागांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या रुग्णसंख्येने आणि मृतांच्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उद्भवलेला डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक घातक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. पण डेल्टाहूनही अधिक जीवघेणा व्हायरस येऊ शकतो का? याबाबत तज्ज्ञ सध्या संशोधन करत आहेत. या व्हेरिएंटबाबत अद्याप पूर्णपणे संशोधन झालेलं नाही. पण हा व्हायरस सध्या जगातील 135 देशांमध्ये पसरला असून जगाची चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

भीषण, भयंकर, भयावह! डेल्टाहून अधिक जीवघेणा व्हेरिएंट येऊ शकतो समोर?; तज्ज्ञ म्हणतात...

कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट इतर व्हेरिएंच्या तुलनेत सर्वाधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णामध्ये याची लक्षणं कमी वेळात दिसून येत आहेत. तसेच डेल्टा व्हेरिएंटमुळे अन्य आजारांना देखील आमंत्रण मिळत आहे. कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट इतर व्हेरिएंच्या तुलनेत सर्वाधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णामध्ये याची लक्षणं कमी वेळात दिसून येत आहेत. तसेच डेल्टा व्हेरिएंटमुळे अन्य आजारांना देखील आमंत्रण मिळत आहे. चीनी संशोधकाच्या मते डेल्टा व्हायरस हा कोरोना व्हायरसच्या मुळ रुपाच्या तुलनेत तब्बल 1260 पट अधिक संसर्गजन्य आहे. काही अमेरिकन संशोधकांच्या मते, लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही डेल्टाची लागण झाली आहे.

Web Title: CoronaVirus Live Updates iran in deep crisis due to coronavirus one person dies in every two minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.