CoronaVirus Live Updates : दिलासादायक! 'या' देशाने केली कोरोनामुक्तीची घोषणा; वर्षभराने झाली मास्कपासून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 11:32 AM2021-04-19T11:32:58+5:302021-04-19T11:37:42+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना एक दिलासादायक घटना समोर आली आहे.

CoronaVirus Live Updates israel drops outdoor mask mandate after 80 percent population are now covid 19 vaccinated | CoronaVirus Live Updates : दिलासादायक! 'या' देशाने केली कोरोनामुक्तीची घोषणा; वर्षभराने झाली मास्कपासून सुटका

CoronaVirus Live Updates : दिलासादायक! 'या' देशाने केली कोरोनामुक्तीची घोषणा; वर्षभराने झाली मास्कपासून सुटका

googlenewsNext

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 14 कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काही देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच कोरोनाग्रस्तांच्या आणि मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना एक दिलासादायक घटना समोर आली आहे. एका देशाने कोरोनावर मात करून कोरोनामुक्तीची घोषणा केली आहे. 

इस्रायलने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. एक वर्षानंतर घराबाहेर पडताना आता मास्क अनिवार्य करण्याचा नियम रद्द केला आहे. इस्रायलमध्ये जवळपास 80 टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. त्यानंतर आता इस्रायलने रविवारी मास्क वापराचा अनिवार्य वापर करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. इस्रायलमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणावर करण्यात आले होते. त्यानंतर रुग्णांची संख्या कमी झाली. काही नियमांमध्ये शिथिलता देणे शक्य झाले असल्याचे इस्रायलचे आरोग्यमंत्री युली इडेलस्टेन यांनी म्हटलं आहे. 

इस्रायलमध्ये कार्यालयामध्ये मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, 93 लाख लोकसंख्या असलेल्या इस्रायलमध्ये आतापर्यंत 50 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. लसीकरणानंतर कोरोना रुग्णांचे रुग्णालयातील प्रमाण कमी झाले आहे. तसेच मृतांची संख्याही कमी झाली. इस्रायलमध्ये फायजरच्या लसीचं लसीकरण करण्यात आलं. कोरोना लसीकरणानंतर इस्रायलमधील परिस्थिती बदलली आहे. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत इस्रायलमध्ये दररोज सरासरी दहा रुग्ण आढळत होते. आज हेच प्रमाण सरासरी 200 दररोज इतके कमी झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा जास्त धोका; रिसर्चमधून समोर आली धडकी भरवणारी माहिती

आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचं आता समोर आलं आहे. एका रिसर्चमध्ये हा धडकी भरवणारा खुलासा करण्यात आला आहे. व्यायाम आणि शारीरीक हालचाली कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं तीव्र असून, अशा लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याची माहिती मिळत आहे. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन या वैद्यकीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या संशोधनानुसार, कोरोनाची साथ येण्याच्या दोन वर्ष आधापासून ज्या व्यक्तींना व्यायाम करणं सोडून दिलं. त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक हालचाली कमी आहेत. त्यांना कोरोनानंतर रुग्णालयात दाखल करावं लागतं आहे. 

Web Title: CoronaVirus Live Updates israel drops outdoor mask mandate after 80 percent population are now covid 19 vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.