CoronaVirus Live Updates : धोका वाढला! "हा" देश ठरतोय नवा "कोरोना हॉटस्पॉट"; लसीकरणानंतरही होतोय वेगाने प्रसार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 11:59 AM2021-09-04T11:59:00+5:302021-09-04T12:08:30+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असून जगातील सर्वाधिक लसीकरण झालेला हा देश आहे. 

CoronaVirus Live Updates israel is now world covid hotspot cases soar despite country vaccine roll out | CoronaVirus Live Updates : धोका वाढला! "हा" देश ठरतोय नवा "कोरोना हॉटस्पॉट"; लसीकरणानंतरही होतोय वेगाने प्रसार

CoronaVirus Live Updates : धोका वाढला! "हा" देश ठरतोय नवा "कोरोना हॉटस्पॉट"; लसीकरणानंतरही होतोय वेगाने प्रसार

googlenewsNext

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. याच दरम्यान इस्रायल कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरत आहे. लसीकरणानंतरही इस्रायलमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं समोर आलं आहे. इस्रायलमध्ये आतापर्यंत 10 लाख लोकसंख्येमागे 1 हजार 892 जणांना कोरोना होत असल्याचं समोर आलं आहे. ऑगस्टच्या मध्यापासून कोरोना प्रसार वेगाने होत असल्याचं दिसत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असून जगातील सर्वाधिक लसीकरण झालेला हा देश आहे. 

इस्रायलमध्ये चौथ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मृतांचा आकडा वेगाने वाढत आहे. जुलैपासून 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस दिले जात आहेत. लसीकरणामुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे आकडेवारी सांगत आहे. नागरिकांवर करोनाचा बूस्टर डोस घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. ज्या लोकांना लसीचा तिसरा डोस मिळाला नाही, त्यांना प्रवास, बारमध्ये जाणे, बाहेर खाणे आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्यापासून रोखले जात आहे. 

कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

इस्रायली नागरिकांना त्यांच्या दुसऱ्या डोसच्या सहा महिन्यांच्या आत फायझर-बायोटेक लसीचा तिसरा डोस घेणं आवश्यक आहे. इस्रायलमध्ये लसीकरणाच्या जोरावर याआधी कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यात आला होता. त्यामुळे इस्रायलमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कवरील बंधने शिथिल करण्यात आली होती. तसेच शिक्षण संस्थाही पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"कोरोनाविरोधात लढण्यासाठी लसीच्या तीन डोसची आवश्यकता"; तज्ज्ञांचा मोठा दावा

जगभरात कोरोना लसीकरण वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. चीनमधून संसर्गास सुरुवात झालेल्या या व्हायरसबाबत अजूनही वेगवेगळी मतमतांतरे मांडली जात आहेत. यादरम्यान अमेरिकेतील ज्येष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉक्टर अँथनी फौसी यांनी एक दावा केला आहे. कोरोना लसीचे सामान्यतः दोन डोस जगभरात दिले जात आहेत. अमेरिकेसह काही देशांमध्ये, हाय रिस्क असलेल्या लोकांना लसीचे तीन डोस देखील दिले जात आहेत. पण आता डॉक्टर अँथनी फौसी यांनी लोकांना येत्या काळात कोरोना लसीच्या तीन डोसची आवश्यकता असू शकते असं म्हटलं आहे. त्यांच्या मते, दोन डोस घेतल्यानंतर काही महिन्यांनी, कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडी कमी होत आहेत. त्यांनी या संबंधित काही डेटा देखील दाखवला आहे. फौसी यांनी इस्रायलचा डेटा शेअर केला. इस्रायलमध्ये मोठ्या संख्येने लोकांना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, 10 लाख लोकांना ज्यांना लसीचे तीन डोस देण्यात आले आहेत. त्यांच्यावर त्यांचा खूपप चांगला परिणाम झाला आहे. या सर्वांना फायझरची लस देण्यात आली. 

Web Title: CoronaVirus Live Updates israel is now world covid hotspot cases soar despite country vaccine roll out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.