CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! प्रदूषणामुळेही वेगाने पसरतोय कोरोना, रिसर्चमधील मोठा खुलासा धडकी भरवणारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 01:01 PM2021-07-27T13:01:59+5:302021-07-27T13:07:43+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनावर विविध ठिकाणी संशोधन सुरू असून संशोधनातून नवनवीन माहिती सातत्याने समोर येत आहे. प्रदूषणामुळेही कोरोना वेगाने पसरत असल्याची माहिती आता समोर आली आहे.

CoronaVirus Live Updates scientists believe strong link between pollution and coronavirus and its proven | CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! प्रदूषणामुळेही वेगाने पसरतोय कोरोना, रिसर्चमधील मोठा खुलासा धडकी भरवणारा

CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! प्रदूषणामुळेही वेगाने पसरतोय कोरोना, रिसर्चमधील मोठा खुलासा धडकी भरवणारा

googlenewsNext

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. महाभयंकर व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाने लाखो लोकांचा आतापर्यंत बळी घेतला असून जगभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 19 कोटींवर पोहोचली आहे. कोरोनावर विविध ठिकाणी संशोधन सुरू असून संशोधनातून नवनवीन माहिती सातत्याने समोर येत आहे. प्रदूषणामुळेही कोरोना वेगाने पसरत असल्याची माहिती आता समोर आली आहे. रिसर्चमधील हा मोठा खुलासा धडकी भरवणारा आहे. Journal of Exposure Science and Environmental Epidemiology मध्ये याबाबत रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. 

संशोधकांनी कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यामागे प्रदूषण जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. जेव्हा जेव्हा प्रदूषणात वाढ झाली तेव्हा तेव्हा कोरोनाचा प्रसार अधिक झाल्याचं म्हटलं आहे. Desert Research Institute च्या वतीने हा रिसर्च करण्यात आला आहे. Daniel Kiser यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवाडा येथील रेनो परिसरात हा रिसर्च करण्यात आला. जिथे कॅलिफोर्नियामधील जंगलात लागलेल्या आगीमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. जिथे प्रदूषणाचा स्तर उच्च होता, तिथे कोरोनाचा पॉझिटिव्ही रेटही वाढला. या परिसरात प्रदूषण वाढल्याने 18 टक्के अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 

Reno Gazette Journal ला माहिती देताना डेनियल कायजर यांनी पश्चिम अमेरिकेमध्ये 80 हून अधिक जंगलांमध्ये आग लागलेली पाहायला मिळत आहे. यामुळे निर्माण झालेल्या धुरामुळेच आणि प्रदूषणामुळे न्यूयॉर्कमध्ये पोहचल्याने तिथे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळेच लोकांनी कोरोनाची लस घेणं आवश्यक आहे. तसेच मास्क लावणं देखील गरजेचं असल्याचं म्हटलं जात आहे. संशोधकांनी Washoe County Health District and Renown Health कडून डेटा जमा केला होता. जंगलात आग लागली त्यावेळी असलेल्या वातावरणात 2.5 मायक्रोमीटरचे छोटे पार्टिकल्स तरंगत होते. याच पार्टिकल्समध्ये संशोधकांना नव्या प्रकारचा कोरोना व्हायरस आढळून आला आहे. 

रिसर्चमध्ये सहभागी असलेले University of California चे वायु प्रदूषण विशेषज्ञ Kent Pinkerton यांनी दिलेल्या माहितीनुसार, जास्त तापमान, वायु प्रदूषण, हवामानातील बदल यासारख्या गोष्टी कोरोना रुग्णवाढीस मदत करत आहेत. प्रदूषणाच्या छोट्या छोट्या पार्टिकल्सच्या माध्यमातून कोरोना व्हायरसला श्वासामार्फत शरीरात प्रवेश करणं सोपं होतं. टर्कीमध्ये देखील अशाप्रकारचा रिसर्च करण्यात आला असून ज्यामध्ये प्रदूषण आणि कोरोनाचा संबंध असल्याचं म्हटलं आहे. जंगलात आगीमुळे झालेल्या प्रदूषणाने अमेरिकेत रुग्णसंख्या वाढल्याचं समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Web Title: CoronaVirus Live Updates scientists believe strong link between pollution and coronavirus and its proven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.