CoronaVirus Live Updates : परिस्थिती भीषण! अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार; 'या' शहरात फक्त 6 ICU बेड उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 12:52 PM2021-08-09T12:52:20+5:302021-08-09T13:05:00+5:30

US Corona Virus delta variant cases surge austin left with six icu beds : महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.

CoronaVirus Live Updates us corona virus delta variant cases surge austin left with six icu beds | CoronaVirus Live Updates : परिस्थिती भीषण! अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार; 'या' शहरात फक्त 6 ICU बेड उपलब्ध

CoronaVirus Live Updates : परिस्थिती भीषण! अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार; 'या' शहरात फक्त 6 ICU बेड उपलब्ध

Next

अमेरिकत कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. डेल्टा व्हेरिएंटचा कहर असून परिस्थिती गंभीर आहे. टेक्सासच्या ऑस्टिनमध्ये परिस्थिती चिंताजनक असून फक्त सहा आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. येथील कोरोनाची परिस्थिती भयंकर झाली आहे. ऑस्टिनची लोकसंख्या जवळजवळ 24 लाख असून फक्त सहा आयसीयू आणि 300 व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहे.

सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय संचालक डेस्मर वॉक्स यांनी एका निवेदनात "परिस्थिती गंभीर असून याबाबत येथील रहिवाशांना आम्ही मेसेज, ईमेल आणि फोन करून सूचना पाठवत आहोत. सध्या आमच्या रुग्णालयांवर आणि आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण असून आम्ही त्यासाठी काहीच करू शकत नाही" असं म्हटलं आहे. गेल्या महिन्यात रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची सात दिवसांची सरासरी 600% पेक्षा जास्त वाढल्यानंतर धोका वाढला. तर अतिदक्षता विभागातील रुग्णांमध्य तब्बल 570% वाढ नोंदवली गेली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या 4 जुलै रोजी 8 इतकी होती ती आता 102 झाली आहे. 

हॉस्पिटलच्या बेडची उपलब्धता आणि क्रिटिकल केअर सेंटरची संख्या अत्यंत मर्यादित आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पुन्हा एकदा अमेरिकेत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज कोरोनाचे एक लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ झाली असून हॉस्पिटलमध्ये आता जागाच शिल्लक नसल्याचं चित्र आहे. फ्लोरिडा, लुइसियाना आणि मिसीसिप्पीमधील हॉस्पिटल्स हे रुग्णांनी भरून गेले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

कोरोनाचा उद्रेक! अमेरिकेत दररोज आढळतात 1 लाख नवे रुग्ण; हॉस्पिटलमध्ये जागाच नाही, परिस्थिती गंभीर

अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटीचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत आता पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. एका दिवसात कोरोनाचे तब्बल 1 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढली आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. अमेरिकेत कोरोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या भागांमधील लस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालावा लागणार आहे. आरोग्य प्रशासनाने लसीकरण झालेल्या या नागरिकांना मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत. Centers for Disease Control and Prevention च्या संचालकांनी पत्रकार परिषदेत मास्क वापरण्यासंबंधी निर्देश दिले. डेटानुसार लस अत्यंत प्रभावी आहे, मात्र डेल्टाच्या काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका असल्याचं म्हटलं आहे.

Web Title: CoronaVirus Live Updates us corona virus delta variant cases surge austin left with six icu beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.