Coronavirus: फिर भी दिल है हिंदुस्तानी! अमेरिकेत राहून ’या’ जुळ्या बहिणी करतायेत भारतात मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 11:52 AM2020-06-01T11:52:41+5:302020-06-01T11:54:50+5:30
फिर भी दिल है हिंदुस्तानी, हे गाणं तुम्ही ऐकलं असेल, अशाचप्रकारे सातासमुद्रा पलीकडे असणाऱ्या जुळ्या बहिणी भारतातील मजुरांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत.
कानपूर – जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांसमोर संकट उभं केलं आहे. या संकटकाळात अनेक लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. भारतातही कोरोना रुग्णांचा आकडा दीड लाखांच्या वर पोहचला आहे तर ५ हजारांपर्यंत लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाच्या या संघर्षकाळात अनेकांनी विविध प्रकारे पुढाकर घेत लोकांची मदत करत आहे.
फिर भी दिल है हिंदुस्तानी, हे गाणं तुम्ही ऐकलं असेल, अशाचप्रकारे सातासमुद्रा पलीकडे असणाऱ्या जुळ्या बहिणी भारतातील मजुरांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. भलेही या दोघींचा जन्म भारतात झाला नाही, पण एनआरआय आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या या मुलींना भारताबद्दल तितकचं प्रेम आहे. त्यामुळे भारतापासून हजारो किमी दूर असूनही देशातील मुजरांच्या व्यथा त्यांना त्रासदायक ठरत आहेत.
भारतीय मूळ असलेले यशवंत आणि त्यांची पत्नी शिल्पा २००२ च्या सुरुवातीला अमेरिकेत वास्तव्यास गेले. ऑक्टोबर २००२ मध्ये शिल्पाने अमेरिकेत जुळ्या मुलींना जन्म दिला. आरुषी आणि अविषी असं या मुलींचे नाव आहे. कॅलिफॉर्नियाच्या मोंटा विस्का स्कूलमध्ये त्या अकरावीत शिक्षण घेत आहेत. भारताच्या कानपूर शहरात राहणारे त्यांचे आजोबा बीएसएनएल सेवानिवृत्त अखिलेश कुमार आणि आजी माजी कॉलेज प्राध्यापिका डॉ. हेमलता यांच्याकडे दरवर्षी सुट्टीला येतात.
या जुळ्या मुलींचे आजी-आजोबा समाजसेवा करणाऱ्या विष्णपुरी असोसिएशनशी जोडले आहेत. दोन्ही मुली भारतात येतात तेव्हा त्याही समाजसेवेत सहभागी होतात. मागील वर्षी त्यांनी नवाबगंज परिसरात एका शाळेत १५ दिवस मुलांना शिकवणी दिली होती. डॉ. हेमलता यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी या मुलींनी फोन करुन स्थलांतरित मजुरांबद्दल चर्चा केली. या मजुरांचे व्हिडीओ आणि फोटो पाहून त्या व्यथित झाल्या. या दोन्ही मुलींनी अमेरिकेत या मजुरांसाठी फंड गोळा करण्यासाठी साइट बनवली. त्यानंतर १ लाख रुपये पाठवून या मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली. सध्या दर शुक्रवारी या मुलींने पाठवलेल्या रक्कमेतून स्थलांतरित मजुरांना जेवण, पाणी देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
१ ते ७ जून दरम्यान लोकांनी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; केंद्र आणि राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वं
जगप्रसिद्ध व्हिडीओ साइट Youtube ने त्यांचा लोगो काळा केला, जाणून घ्या काय आहे कारण?
७ दिवस अन् १ रस्ता, भारताचं सोनं लुटण्याची चीनने केली तयारी; लडाखमध्ये दडलाय मोठा खजिना!
निर्दयी! ९ महिन्याच्या चिमुकल्याचा कोरोनामुळे मृत्यू; मृतदेह सोडून पळाले आई-वडील