CoronaVirus Lockdown : निष्ठुर पाकिस्तान! लॉकडाऊनमध्ये हिंदूंना रेशन देण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 11:38 AM2020-03-30T11:38:39+5:302020-03-30T11:51:27+5:30
CoronaVirus Lockdown : पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान कराचीमध्ये प्रशासनाने हिंदूंना रेशन देण्यास नकार दिला आहे.
इस्लामाबाद - आज संपूर्ण जग कोरोना संकटाशी लढत आहे. प्रत्येक देश या क्षणी संपूर्ण जगासाठी प्रार्थना करीत आहे, जेणेकरून सर्व काही लवकर ठीक होईल. मात्र, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा अमानुष चेहरा समोर आला आहे. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान कराचीमध्ये प्रशासनाने हिंदूंना रेशन देण्यास नकार दिला आहे.
खरं तर, कराचीच्या रेहड़ी घोथमध्ये हजारो गरीब लोक धान्य आणि दैनंदिन गोष्टींकडे पोचले होते. मात्र, तेथे पोहोचल्यावर अनेक हिंदूंच्या वाट्याला निराशा आली. त्यांना सांगण्यात आले की, तुम्ही इथून जा, रेशन फक्त मुस्लिमांसाठी आहे. तेथील सिंध प्रशासनाने स्थानिक गरीब मजुरांना रेशन वाटप करण्याची व्यवस्था केली होती.
रेशन फक्त मुस्लिमांसाठी आहे म्हणून हिंदूंना त्यांना अन्न दिले जाऊ शकत नाही असे सांगण्यात आले होते असे एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले. राजकीय कार्यकर्ते डॉ. अमजद अयूब मिर्झा म्हणाले की, अल्पसंख्याकांमध्ये आता खाद्यान्नाचे गंभीर संकट ओढवले आहे. सिंधमधील मानवीय संकटाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उशीर न करता हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. कोरोनाचा कहर पाकिस्तानमध्येही पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 1500 हून अधिक लोकांना तेथील विषाणूची लागण झाली आहे.