CoronaVirus, LockdownNews: लॉकडाउनचं उल्लंघन करणाऱ्यांना उघडं करून मारतोय 'ड्रग लॉर्ड' अल चापोचा मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 04:37 PM2020-05-06T16:37:02+5:302020-05-06T16:49:36+5:30
जगातील सर्वात क्रूर ड्रग लॉर्डपैकी एक मॅक्सिकन ड्रग माफिया अल चापोच्या मुलांनी आता लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना केवळ इशाराच नाही, तर उघडे करून मारतानाचे काही व्हिडिओही शेअर केले आहेत.
मेक्सिको : जगातील सर्वात क्रूर ड्रग लॉर्डपैकी एक मॅक्सिकन ड्रग माफिया अल चापोच्या मुलाने शहरात लॉकडाउन लागू करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. मॅक्सिकोमध्ये प्रसिद्ध सिनालोआ ड्रग कार्टेलची जबाबदारी आता अल चापोची मुले आर्चीवाल्डो गजमॅन आणि जीजस अल्फ्रेडो हे सांभाळत आहेत. या दोघांनी आता लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना केवळ इशाराच नाही, तर उघडे करून मारतानाचे काही व्हिडिओही शेअर केले आहेत.
आणखी वाचा - 'त्या' विमान कंपनीकडून सगळे नियम धाब्यावर; अनेक देशांत पोहोचला कोरोनाचा कहर
डेली स्टारमध्ये आलेल्या एका वृत्तानुसार, मॅक्सिकोच्या सिनलोआ भागात कोरोना संक्रमानापासून संक्षण म्हणून लॉकडाउन लागू करणे आणि गरिबांसाठी मदत कार्य सुरू करण्यात ड्रग कार्टेलदेखील सहभाग घेत आहे. सिनालोआची राजधानी कलिकनमध्ये तर कार्टेलने मुलांनाही तैनात केले आहे. जे लोक लॉकडाउनचे उल्लंघन करत आहेत. त्यांना केवळ इशाराच नाही, तर मारहाणही केली जात आहे.
टिकटॉकवर शेअर करतायेत व्हिडिओ -
कार्टेलचे लोक रात्री 10 वाजेनंतर घरातून बाहेर पडणाऱ्यांना केवळ मारतच नाही, तर त्यांचे व्हिडिओही टिकटॉकवर अपलोड करत आहेत. एवढेच नाही, तर या व्हिडिओसोबत एक इशाराही दिला जात आहे, की लॉकडाउनचे उल्लंघन केले तर हीच शिक्षा देण्यात येईल. या व्हिडिओच्या अखेरीस सांगण्यात आले आहे, की हा काही खेळ नाही. आम्ही खेळ खेळत नाहीओत. समोर आलेल्या दोन लोकांनी तर लॉकडाउनचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना दोन दिवस मारहाण करण्यात आल्याचेही सांगितले आहे. तसेच फाइन म्हणून त्यांच्याकडून पैसेही घेण्यात आले आहेत. त्यांना काठी आणि लोखंडाच्या रॉडने मारहान करण्यात आली, असेही ते म्हणाले.
आणखी वाचा - तो किम नव्हेच! २० दिवसांनंतर समोर आला किम जोंग उनचा ड्युप्लीकेट?; चर्चेला पुन्हा उधाण
सिनालोआमध्ये कर्फ्यू नाही -
सिनालोआमध्ये सरकारने कर्फ्यू लागू केलेला नाही, मात्र घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच रात्री 10 वाजेनंतर घरातून कसल्याही प्रकारच्या कामासाठी बाहेर निघण्यावर पूर्णपणे बंदी आहे. कार्टेल लॉकडाउन लागू करण्याबरोबरच लोकांना सढळहाताने मदतही करत आहे. गेल्या महिन्यात अल चापोच्या मुलीचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात ती मदत म्हणून आवश्यक वस्तू, आणि पैसे वाटताना दिसत आहेत. यावेळी तिने अमेरिकेतील कारागृहात बंद असलेल्या आपल्या वडिलांचा फोटोही हातात घेतलेला होता.