Coronavirus: बायकोला फसवणं नवऱ्याला पडलं महागात; प्रेयसीला इटलीला घेऊन गेला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 10:52 AM2020-03-19T10:52:28+5:302020-03-19T11:03:20+5:30

पतीमध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यानंतर त्याने इंग्लंडचे रुग्णालय गाठले.

Coronavirus: Man cheating on wife gets coronavirus while on secret trip to Italy pnm | Coronavirus: बायकोला फसवणं नवऱ्याला पडलं महागात; प्रेयसीला इटलीला घेऊन गेला अन्...

Coronavirus: बायकोला फसवणं नवऱ्याला पडलं महागात; प्रेयसीला इटलीला घेऊन गेला अन्...

Next
ठळक मुद्देयुरोपमध्ये एकूण 3421 आणि आशियामध्ये 3384 मृत्यू झाले आहेतचीननंतर कोरोनाचा फटका इटलीला बसला पत्नीला फसवून पतीने केला महिलेसोबत इटली दौरा

इटली - चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोनाने इटलीतही कहर केला आहे. चीननंतर इटलीत सर्वाधिक लोकांचे जीव कोरोना व्हायरसमुळे गेले आहेत. इटलीत सर्वत्र लॉकडाउन करण्यात आलं आहे. लोकांना गर्दी टाळण्याचं आवाहन केलं आहे. अनेकांना घरातच बंदिस्त करण्यात आलं आहे. 

अशातच एक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीला फसवून एका महिलेसोबत इटलीच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावरुन परतल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. सध्या त्याच्यावर इंग्लंडमधील रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. पतीला कोरोनाची लागण कशी झाली याबाबत पत्नीला काहीच कल्पना नाही. व्यावसायिक कामासाठी युकेला जात असल्याचं पतीने पत्नीला सांगितलं होतं अशी माहिती आहे. 

पतीमध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यानंतर त्याने इंग्लंडचे रुग्णालय गाठले. त्यावेळी तो युकेऐवजी इटलीला गेल्याचं समोर आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. त्या महिलेबाबत विचारणा केली असता त्याने महिलेची ओळख सांगण्यात नकार दिला. सध्या त्याच्या पत्नीला घरीच विलग ठेवण्यात आलं आहे. 

पतीने कबूल केले की त्याने इटलीमध्ये काय केले आहे, त्याच्या बायकोला काही कल्पना नाही. व्यावसायिक दौऱ्यावर गेले असताना पतीला कोरोनाची लागण झाली असं त्याच्या पत्नीला वाटते. मात्र रुग्णालयात पतीने इटलीला गेल्याचं कबूल केले. त्या महिलेबाबत सांगावे, आम्ही कोणाला काहीही सांगणार नाही असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही त्याने नाव सांगितले नाही. सध्या पतीची प्रकृती स्थिर आहे लवकरच तो कोरोना आजारापासून बरा होईल अशी अपेक्षा डॉक्टरांना आहे. परंतु या आजारापेक्षा पतीच्या मनात आपण केलेला प्रताप उघडकीस येईल, पत्नीला सगळं कळेल हीच भीती सतावतेय. 

युरोपमध्ये एकूण 3421 आणि आशियामध्ये 3384 मृत्यू झाले आहेत. सर्वात जास्त कोरोनाचा कहर इटलीमध्ये झाला आहे. इटलीमध्ये बुधवारी दिवसभरात 475 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा कोणत्याही देशाती आकडेवारीपेक्षा जास्त आहे. यामुळे इटलीमध्ये वैद्यकीयचे शिक्षण घेणाऱ्या 10000 विद्यार्थ्यांना डॉक्टर बनविण्यात आले आहे. त्यांची अंतिम परीक्षा रद्द करण्यात आली आहे. 
 

Web Title: Coronavirus: Man cheating on wife gets coronavirus while on secret trip to Italy pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.