CoronaVirus: अनेक देशांकडून निर्बंध मागे; अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 04:01 AM2020-06-26T04:01:05+5:302020-06-26T04:01:26+5:30

परदेशांतून येणा-या प्रत्येकाची सर्व देशांत विमानतळांवर तपासणी केली जात आहे आणि किरकोळ लक्षणे आढळणाऱ्यांनाही ७ ते १४ दिवस क्वारंटाइनमध्ये पाठविले जात आहे.

CoronaVirus: Many countries began to lift sanctions | CoronaVirus: अनेक देशांकडून निर्बंध मागे; अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू

CoronaVirus: अनेक देशांकडून निर्बंध मागे; अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू

Next

बँकॉक : जगातील जवळपास सर्व देशांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली आणि आर्थिक अडचणींतून बाहेर पडण्यासाठी या देशांतील अनलॉक प्रक्रिया सुरू केली असली, तरी सर्वत्र मास्कचा वापर, कोरोनाच्या चाचण्या सुरू असून, प्रवासावरील निर्बंधही अनेक ठिकाणी कायम आहेत.
सर्वच देशांनी आपल्या नागरिकांना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. पण, अनेक जण त्याचे पालन करीत नसल्याने काही देशांनी मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड आकारत आहेत वा त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करीत आहेत. परदेशांतून येणा-या प्रत्येकाची सर्व देशांत विमानतळांवर तपासणी केली जात आहे आणि किरकोळ लक्षणे आढळणाऱ्यांनाही ७ ते १४ दिवस क्वारंटाइनमध्ये पाठविले जात आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत आल्या आहेत, तर काही ढासळण्याच्या मार्गावर आहेत. ती रुळावर कशी आणायची, हा तेथील सरकारांपुढील यक्षप्रश्न आहे. त्यामुळे युरोपीय राष्ट्रांनी १ जुलैपासून आपल्या सीमा एकमेकांसाठी खुल्या करण्याचे आणि निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे. दुबईने रात्रीची संचारबंदी मागे घेतली असून, तिथे कोणत्याही वेळी कोणालाही फिरण्याची, व्यापाराची, खरेदीची मुभा दिली आहे. मात्र मास्क बंधनकारक आहे.
>जिथे मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक जातात, त्या मालदीव, थायलंड, स्पेन आदी देशांनी निर्बंध खूपच कमी केले आहेत. मालदीव व थायलंडची अर्थव्यवस्था आणि तेथील लोकांचे आयुष्य पर्यटन व्यवसायावरच अवलंबून आहे. मात्र तिथेही हॉटल, रिसॉर्ट, बार यांवर अनेक निर्बंध असून, मास्क घालणे बंधनकारक आहे.

 

Web Title: CoronaVirus: Many countries began to lift sanctions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.