CoronaVirus News : 54 दिवसांचा लढा, 30 दिवस व्हेंटिलेटर; 5 महिन्यांच्या चिमुकलीने जिंकलं कोरोनाचं युद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 08:54 PM2020-06-01T20:54:17+5:302020-06-01T20:55:47+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान काही दिलासादायक घटनाही समोर येत आहेत.
रियो डी जेनेरो - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 374,554 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 6,302,150 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाख 90 हजारांहून अधिक झाली असून आतापर्यंत 5000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनामुळे जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान काही दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमध्ये एका 5 महिन्यांच्या चिमुकलीने कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. विशेष म्हणजे तब्बल एक महिना हे बाळ व्हेंटिलेटरवर होतं. मात्र त्यानंतर आता यशस्वीरित्या मात दिली आहे. चिमुकल्याने कोरोनाला हरवल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी तर हा एक चमत्कार असल्याचं देखील म्हटलं आहे.
CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने कुटुंबियांनी उचललं टोकाचं पाऊलhttps://t.co/T7EiIKWDEP#coronaupdatesindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2020
काही दिवसांपूर्वी 5 महिन्यांच्या चिमुकलीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार हे बाळ एका महिन्यांपासून कोमामध्ये होतं. यानंतर या व्हायरसच्या संकटातून बाळ सुखरुपरित्या बाहेर आलं आहे. डोम असं मुलीचं नवा असून रियो डी जेनेरो प्रो कॉर्डिको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. जवळपास 54 दिवस तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनावर मात केल्यानंतर बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आयुष विभागाने आणलं 'हे' खास किट; असा होणार फायदाhttps://t.co/iHDDzaWanW#CoronaUpdatesInIndia#coronaupdatesindia#COVID19India#CoronaWarriors
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2020
चिमुकलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता. सुरुवातीच्या काळात डॉक्टरांना हे बॅक्टिरियल इंफेक्शन आहे अस वाटलं. मात्र दिवसेंदिवस मुलीची प्रकृती अधिकच खराब होत गेली. यानंतर मुलीला दुसर्या रुग्णालयामध्ये हलवले. तिथे मुलीची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. त्यानंतर उपचार सुरू झाले. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये आतापर्यंत 5 लाख 14 हजार 849 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 29 हजार 300 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : लॉकडाऊन कधी आणि कसा हटवला जावा?, डॉक्टरांनी केला अभ्यासhttps://t.co/NixBTUy869#CoronavirusIndia#coronaupdatesindia#COVID19India#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... रस्त्यावर सोडून दिला मृतदेह
TikTok चं वेड, जिवाशी खेळ; व्हिडीओ करताना झालं असं काही अन्...
CoronaVirus News : कोरोना योद्ध्यांसाठी 'ही' औषधी ढाल फायदेशीर ठरणार, व्हायरसपासून रक्षण होणार
CoronaVirus News : लॉकडाऊन कधी हटवावा?, AIIMSच्या डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
CoronaVirus News : लॉकडाऊननंतर शाळेमध्ये शिकवण्याच्या पद्धतीत होऊ शकतात 'हे' बदल
CoronaVirus News : कौतुकास्पद! ...म्हणून नवजात बाळाला नर्सने पाजलं दूध; तुम्हीही कराल सलाम