CoronaVirus News : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत आढळले तब्बल 68,428 नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 09:59 AM2020-07-17T09:59:04+5:302020-07-17T09:59:57+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.
कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 592,690 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर रुग्णांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली आहे.
कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा 35 लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 974 लोकांचा मृत्यू झाला. तर तब्बल 68,428 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
68,428 #COVID19 cases & 974 deaths in USA in the last 24 hours. Total number of cases in the country now at 35,60,364, including 1,38,201 deaths: AFP news agency
— ANI (@ANI) July 17, 2020
जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत 974 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाचे 68,428 नवे रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 35,60,364 झाली असून आतापर्यंत 1,38,201जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांसाठी 'या' राज्याने सुरू केली नवी योजनाhttps://t.co/nRT7ciCAWu#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 17, 2020
जगभरात तब्बल 13,949,386 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 8,278,974 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. भारतातही कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. एका बाजूला कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला रुग्ण बरे होण्याचं प्रमाणदेखील वाढत आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 63.25 टक्क्यांवर गेलं आहे. बहुतांश कोरोना रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं आढळून येतात.
CoronaVirus News : डॉक्टरने रुग्णाचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यामागे 'हे' आहे कारण; वाचून तुम्हीही कराल भरभरून कौतुकhttps://t.co/6uolorHrGN#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia#CoronaWarriors
— Lokmat (@MiLOKMAT) July 14, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : 'प्लाझ्मा दान करा आणि 5000 मिळवा'; 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय
CoronaVirus News : बापरे! कोरोनाग्रस्ताला आली पान मसाल्याची तलफ, रुग्णालयातून काढला पळ अन्...
चीनने 59 अॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर