CoronaVirus News : चिंता वाढली! 5 महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या महिलेला पुन्हा लागण, डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 10:48 AM2020-08-13T10:48:43+5:302020-08-13T10:53:57+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

CoronaVirus Marathi News after treatment corona woman china tested positive again | CoronaVirus News : चिंता वाढली! 5 महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या महिलेला पुन्हा लागण, डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण

CoronaVirus News : चिंता वाढली! 5 महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या महिलेला पुन्हा लागण, डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण

Next

कोरोनाचा उद्रेक झाला असून सातत्याने धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाचा ग्राफ वेगाने वाढताना दिसून येत आहे. खबरदरीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून आतापर्यंत 20,806,983 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान आणखी एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. 

पाच महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या महिलेला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. यामुळे चीनमध्ये ही घटना घडली असून आरोग्य यंत्रणा आणि डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका 68 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर महिलेला डिस्चार्ज देण्यात आला होता. पण पाच महिन्यांनी पुन्हा एकदा महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याने चिंता वाढली आहे. 

हुबेई प्रांतातील रुग्णालयात महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. ग्लोबल टाईम्सने याबाबत माहिती दिली आहे. महिला कोरोनामुक्त झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात तिला डिस्चार्ज देण्यात आला होता. "दुर्मिळ अशा या प्रकरणात व्हायरस शरीरातून नष्ट होण्यासाठी खूप वेळ घेत असल्याचं समोर येत आहे" असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. ही महिला 9 ऑगस्टला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. सध्या तिला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. 

महिलेच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली असता ते निगेटिव्ह आढळले आहेत. वुहान विद्यापीठातील रोगकारक जीवशास्त्र विभागाचे यांग झांगक्यू यांनी 'या केसवरुन कोरोना व्हायरस शरीरातून पूर्ण नष्ट होण्यासाठी खूप वेळ घेईल हे निदर्शनास येत आहे. काही रुग्णांच्या शरीरात व्हायरसचं प्रमाण कमी असतं, यामुळेच आधी महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असण्याची शक्यता आहे' असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

महत्त्वाच्या बातम्या

Video - "स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तूंवर सरसकट बहिष्कार टाकणं नाही"

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात गेल्या 24 तासांत तब्बल 2.74 लाख नवे रुग्ण, चिंताजनक आकडेवारी

सलाम! विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने केला तब्बल 100 किमीचा प्रवास, 13 गावांतील मुलांना दिली पुस्तकं

कडक सॅल्यूट! ...अन् गर्भवती महिलेसाठी आमदार ठरले देवदूत, डॉक्टरांच्या अनुपस्थितीत केली प्रसूती

बापरे! बाईक दिली नाही म्हणून 'तो' 100 फूट उंच विजेच्या खांबावर चढला अन्..

Corona Vacine : 20 वर्षांपासूनच्या शोधाची कमाल; रशियाकडून SputnikV वेबसाईट लाँच

भयंकर! धावत्या बसने अचानक घेतला पेट; 5 जणांचा होरपळून मृत्यू, 27 जण जखमी

"ऑपरेशन कमळ' फसले, हा राजकीय विकृतीचा पराभव', शिवसेनेचं भाजपावर टीकास्त्र

Web Title: CoronaVirus Marathi News after treatment corona woman china tested positive again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.