CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 03:21 PM2020-06-04T15:21:23+5:302020-06-04T15:28:11+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर दुसरीकडे भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 388,354 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 6,590,329 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 3,182,969 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर दुसरीकडे भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांवर गेली असून पाच हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार असून भारताला मदत करणार आहे. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी अमेरिकेकडून 100 व्हेंटिलेटर पुढील आठवड्यामध्ये भारताकडे दिले जाणार आहेत. 'व्हाईट हाऊस'कडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
CoronaVirus News : एमर्जन्सी चेन खेचली, मजुरांनी श्रमिक ट्रेनमधून उड्या मारल्या अन्...https://t.co/tpmcPJSouH#CoronavirusInIndia#CoronavirusIndia#COVID19India#railways
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2020
फोनवरील संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी मोदींना जी-7 राष्ट्रांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी विशेष निमंत्रण दिलं. भारत जी-7 चा भाग नाही. मात्र ट्रम्प यांनी भारताचा समावेश जी-7मध्ये करण्याची इच्छा मोदींकडे व्यक्त केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या निमंत्रणावर मोदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कोरोनानंतरच्या काळात अशा मजबूत संघटनेची आवश्यकता असल्याचं मोदी म्हणाले. जी-७ परिषदेत अमेरिका आणि इतर देशांसोबत काम करणं भारतासाठी निश्चितच आनंदाची बाब असेल, असं मोदींनी म्हटलं. यावेळी पंतप्रधानांनी अमेरिकेत सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली. परिस्थिती लवकरत सुधारेल, अशी आशाही मोदींनी व्यक्त केली. जॉर्ज फ्लॉयर्ड नावाच्या एका कृष्णवर्यीय व्यक्तीचा पोलिसी अत्याचारात मृत्यू झाल्याचा आरोप असून त्याविरोधात अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये सध्या आंदोलनं सुरू आहेत.
CoronaVirus News : लढ्याला यश! देशातील रुग्णांना दिलं जाणार अमेरिकेचं औषधhttps://t.co/sqqu5ZnVi8#coronavirus#CoronaVirusUpdates#CoronavirusInIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 3, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : ...म्हणून चेन खेचून मजुरांनी काढला ट्रेनमधून पळ; रेल्वे स्थानकावर झाला गोंधळ
CoronaVirus News : कोरोनामुळे बाप-लेकाची ताटातूट! नवजात बाळाला पाहण्यासाठी 'तो' व्याकूळ झाला पण...
'या' कंपनीचे तब्बल 74 कर्मचारी करोडपती झाले; CEO चे पॅकेजही 39 टक्क्यांनी वाढले
CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाची लढाई लवकरच जिंकता येणार; 'हे' औषध प्रभावी ठरणार
Mitron युजर्ससाठी अलर्ट! त्वरित डिलीट करा अॅप नाहीतर...
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'या' राज्याचा रेकॉर्ड; तब्बल 4.85 कोटी लोकांचं केलं स्क्रिनिंग