CoronaVirus News : बघूया सर्वात आधी कोणाला होतोय कोरोना; लागण होण्यासाठी रुग्णासोबत पार्टीचं आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 09:02 AM2020-07-04T09:02:46+5:302020-07-04T09:03:09+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोनावरील संशोधनासाठी शास्त्रज्ञ आणि टीम दिवस-रात्र मेहनत घेत आहेत

CoronaVirus Marathi News american students doing parties get infected covid19 | CoronaVirus News : बघूया सर्वात आधी कोणाला होतोय कोरोना; लागण होण्यासाठी रुग्णासोबत पार्टीचं आयोजन

CoronaVirus News : बघूया सर्वात आधी कोणाला होतोय कोरोना; लागण होण्यासाठी रुग्णासोबत पार्टीचं आयोजन

googlenewsNext

वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 524,188 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एक कोटीहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.

जगभरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोनावरील संशोधनासाठी शास्त्रज्ञ आणि टीम दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. मात्र एका ठिकाणी कोरोनाची लागण व्हावी या उद्देशाने खास पार्टीचं आयोजन केलं जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासाठी कोरोनाग्रस्ताला पैसे देऊन पार्टीसाठी निमंत्रण दिलं जातं आणि त्यानंतर सर्वप्रथम कोण आजारी पडणार याची स्पर्धा रंगत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेत हा भयंकर प्रकार सुरू असल्याची घटना घडली आहे. 

कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहे. मात्र अशावेळी अमेरिकेच्या अलबामामध्ये विचित्र प्रकारच्या पार्टीचं आयोजन गेल्या कित्येक दिवसांपासून करण्यात येत असल्याचं आता समोर आलं आहे. यामध्ये कोरोनाची लागण व्हावी यासाठी कोरोनाग्रस्ताला पार्टीचं आमंत्रण दिलं जातं. त्याला पार्टीत येण्यासाठी विनंती केली जाते आणि पैसे दिले जातात. त्यानंतर कोणाला सर्वप्रथम लागण होते. हे पाहिलं जातं. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला त्यांना जेव्हा अशा पार्टीबद्दल माहिती मिळाली तेव्हा ती अफवा वाटली मात्र त्यानंतर याची संपूर्ण चौकशी केली असता कोरोनाची लागण होण्यासाठी मुद्दाम अशा पार्टीचं आयोजन केल्याचं समजलं. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चाललेली असताना या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 10,992,462 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 6,152,481 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धूम्रपान करता?, वेळीच व्हा सावध; कोरोनाचा आहे सर्वाधिक धोका

घरी राहा, सुरक्षित राहा! येत्या 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

CoronaVirus News : बापरे! क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट; अनेकांना कोरोनाची लागण, घटनेने खळबळ

रुग्णालयाचा निष्काळजीपणा! डॉक्टरने घरबसल्या VCवरून दिल्या सूचना, कंपाऊंडरने केलं डायलेसिस अन्...

CoronaVirus News : 'या' रुग्णांसाठी होम आयसोलेशन नाही; आरोग्य मंत्रालयाने बदलले नियम

 

Web Title: CoronaVirus Marathi News american students doing parties get infected covid19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.