CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! 'या' देशात घराघरात, रस्त्यावर आढळताहेत मृतदेह, परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 01:29 PM2020-07-25T13:29:53+5:302020-07-25T13:34:58+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 642,875 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

CoronaVirus Marathi News bolivia police recover 400 bodies most are covid positive | CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! 'या' देशात घराघरात, रस्त्यावर आढळताहेत मृतदेह, परिस्थिती गंभीर

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! 'या' देशात घराघरात, रस्त्यावर आढळताहेत मृतदेह, परिस्थिती गंभीर

googlenewsNext

जगभरातील अनेक देश कोरोनाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 642,875 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दीड कोटीहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 15,948,904 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 9,745,276 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान अनेक देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. 

दक्षिण अमेरिकेत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. बोलिव्हियात गंभीर परिस्थिती असून रस्त्यांवर आणि घराघरात मृतदेह पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेहांचा खच पडला असून त्यातील सर्वाधिक मृतदेह हे कोरोना रुग्णांचे आहेत. फक्त पाच दिवसांत पोलिसांनी रस्त्यांवरून आणि घरांमधून तब्बल 400 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. यातील जवळपास 85 टक्के लोकांचा मृत्यू हा कोरोना व्हायरसमुळे झाल्याचं म्हटलं जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोलिव्हियातील कोचाबांबा शहरामधून 191, ला पेज शहरातून 141 तर देशातील सर्वात मोठं शहर असलेल्या सांता क्रूझमधून 68 मृतदेह ताब्यात घेतले आहेत. बोलिव्हियाचे पोलीस प्रमुख कर्नल इवान रोजस यांनी याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मृतदेहांपैकी 85 टक्के मृतदेह हे कोरोनाग्रस्तांचे आहेत. तर काही जणांचा मृत्यू हा इतर आजार आणि हिंसाचारामुळे झाला आहे. 

बोलिव्हियामधील परिस्थिती सध्या गंभीर आहे. रस्त्यावर आणि घराघरात मृतदेह सापडत असल्याने चिंता वाढली आहे. दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बोलिव्हियात 60 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण असून 2200 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक एप्रिलपासून आतापर्यंत रुग्णालयाच्या बाहेर तीन हजारांहून मृतदेह आढळून आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"हल्ली विरोधी पक्षनेतेपदाचे दिवस धूमधडक्यात साजरे होताहेत", मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना चिमटा

शाळा ही कन्सेप्ट बाजूला ठेवून शिक्षणाचा विचार करावा लागेल, उद्धव ठाकरेंचं महत्त्वपूर्ण विधान

डॉक्टर व्हावंसं वाटायचं, नाही झालो ते बरंच झालं; उद्धव ठाकरेंचं 'होमिओपॅथी कनेक्शन'

कोरोनासोबत जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं?...खुद्द मुख्यमंत्र्यांनीच समजावलं

CoronaVirus News : अरे व्वा! देशातील वयोवृद्ध दाम्पत्याने जिंकली कोरोनाची लढाई, तब्बल 25 दिवसांनी केली मात

मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; Helo Lite सहीत 'या' अ‍ॅप्सवर घालणार बंदी 

CoronaVirus News : कोरोना संकटातील भयानक वास्तव! 50 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार, सरकारने दिलं 'हे' कारण

Web Title: CoronaVirus Marathi News bolivia police recover 400 bodies most are covid positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.