CoronaVirus News : कोरोनाचा कहर! 'या' देशात तब्बल 7 लाख नागरिकांचा होणार मृत्यू?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 04:14 PM2020-05-12T16:14:08+5:302020-05-12T16:16:42+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 287,615 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
लंडन - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 287,615 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 4,272,729 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर तब्बल 1,536,196 लोक बरे झाले आहेत. अमेरिका, इटली आणि स्पेनमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 269 लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रिटनमध्ये सात लाख जणांचा मृत्यू होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोरोनामुळे ब्रिटनमध्ये 31,855 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. युनिर्व्हसिटी ऑफ ब्रिस्टलच्या संशोधनानुसार, कोरोनाच्या संसर्गामुळे ब्रिटनमध्ये सात लाख नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या जीवितहानीपेक्षा हा आकडा मोठा आहे. त्याशिवाय मंदी, गरिबी आणि आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळपणा आदी कारणांमुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याचा धोका असल्याची माहिती मिळत आहे.
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेलhttps://t.co/Arqtj0BgBB">https://t.co/Arqtj0BgBB; https://twitter.com/hashtag/CoronaUpdatesInIndia?src=hash&ref_src=t…">#CoronaUpdatesInIndiahttps://twitter.com/hashtag/COVID19India?src=hash&ref_src=twsrc%5Et…">#COVID19Indiahttps://twitter.com/hashtag/healthtips?src=hash&ref_src=twsrc%5Etfw">#healthtips
— Lokmat (@MiLOKMAT) https://twitter.com/MiLOKMAT/status/1260115915330523142?ref_src=twsrc%5…">May 12, 2020
कोरोना प्रतिबंधक लस न सापडल्यास ब्रिटनला कोरोनाला हरवण्यासाठी 2024 पर्यंत सोशल डिस्टेंसिंगचा पर्याय वापरावा लागेल. लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदीही मोठ्या प्रमाणावर येणार असल्याचे संशोधनात म्हटले आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग, ढिसाळ आरोग्य व्यवस्था आणि गरिबी यामुळे पाच वर्षात 6.75 लाख जणांचा मृत्यू होऊ शकतो. ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4000 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दोन लाख 19 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : धोका वाढला! नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 70 हजार पारhttps://t.co/X1ifsHJJuR">https://t.co/X1ifsHJJuR; https://twitter.com/hashtag/coronavirus?src=hash&ref_src=twsrc%5Etfw">#coronavirushttps://twitter.com/hashtag/coronaupdatesindia?src=hash&ref_src=tws…">#coronaupdatesindiahttps://twitter.com/hashtag/COVID19India?src=hash&ref_src=twsrc%5Et…">#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) https://twitter.com/MiLOKMAT/status/1260089665312489474?ref_src=twsrc%5…">May 12, 2020
भारतामध्येही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 3604 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या ही 70 हजारांच्या वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे देशात 2293 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 9 महिन्यांची गर्भवती नर्स करतेय कोरोनाग्रस्तांची सेवा, पंतप्रधानांनी केलं कौतुकhttps://t.co/SlubvWLeD1">https://t.co/SlubvWLeD1; https://twitter.com/hashtag/CoronaUpdatesInIndia?src=hash&ref_src=t…">#CoronaUpdatesInIndiahttps://twitter.com/hashtag/COVID19India?src=hash&ref_src=twsrc%5Et…">#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) https://twitter.com/MiLOKMAT/status/1260121423571496961?ref_src=twsrc%5…">May 12, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! 'या' शहरात 'कॅश ऑन डिलिव्हरी'वर बंदी
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; कोट्यवधी लोकांना होणार फायदा
लॉकडाऊननंतर इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल-डिझेल महागणार?; 'हे' आहे कारण
CoronaVirus News : "कोरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचे शोषण नको"
CoronaVirus News : होम क्वारंटाईन कधी संपणार?; आरोग्य मंत्रालयाकडून नियमात मोठा बदल