CoronaVirus News : अमेरिकेने केला चीनवर गंभीर आरोप; सांगितलं कोरोना पसरण्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 10:15 AM2020-05-15T10:15:09+5:302020-05-15T10:15:45+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: संपूर्ण जगाला संकटात टाकणाऱ्या कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून झाल्याचा दावा अमेरिकेने केला होता. यानंतर आता अमेरिकेने चीनवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. 

CoronaVirus Marathi News china stealing united state research corona mike pompeo sss | CoronaVirus News : अमेरिकेने केला चीनवर गंभीर आरोप; सांगितलं कोरोना पसरण्यामागचं कारण

CoronaVirus News : अमेरिकेने केला चीनवर गंभीर आरोप; सांगितलं कोरोना पसरण्यामागचं कारण

googlenewsNext

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 303,405 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 45 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 4,526,905 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 1,303,869 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. संपूर्ण जगाला संकटात टाकणाऱ्या कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून झाल्याचा दावा अमेरिकेने केला होता. यानंतर आता अमेरिकेने चीनवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. 

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी चीनवर गंभीर आरोप केला आहे. तसेच कोरोना व्हायरस पसरण्यामागचं नेमकं कारण देखील सांगितलं आहे. कोरोना व्हायरसवरील संशोधनातील डेटा चोरत असल्याचा आरोप करत पॉम्पिओ यांनी चीनवर निशाणा साधला आहे. 'चीनशी संबंधित असलेल्या सायबर हॅकर्सने केलेल्या प्रयत्नांचा अमेरिका निषेध करते आणि अशा कारवाया थांबवल्या पाहिजेत असं आम्ही आवाहन करतो' असं पोम्पिओ यांनी म्हटलं आहे. कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 80 हजार बळी  घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

'चीन असा देश आहे ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली आणि त्यांच्यामुळेच जगभरात हा व्हायरस पसरला गेला. चीनने कोरोना व्हायरसशी निगडीत माहिती जगाला देण्यास मनाई केली. त्यामुळेच आज मोठी समस्या निर्माण झाली आहे' असंही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी संपूर्ण जगाला संकटात टाकणाऱ्या कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून झाल्याचा दावा अमेरिकेने केला होता.

CoronaVirus News : 'कोरोना व्हायरसचा प्रसार वुहानच्या प्रयोगशाळेतून झाला'; अमेरिका ठाम

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी कोरोना विषाणूची निर्मिती चीनमधील प्रयोगशाळेत करण्यात आली, याचे ठोस पुरावे अमेरिकेच्या हाती लागले आहेत असं म्हटलं होतं. तसेच चीनने ज्या पद्धतीने कोरोना साथीचा मुकाबला केला, त्या गोष्टी संशयास्पद आहेत, असेही ते म्हणाले. 'मी मिळालेली संपूर्ण माहित जाहीर करू शकत नाही. पण कोविड-19 च्या प्रसाराबाबतची महत्त्वाची माहिती आमच्याकडे आहे आणि त्याचा प्रसार होण्यास वुहानची प्रयोगशाळाच कारणीभूत आहे यावर आम्ही ठाम झालो आहोत' असं पॉम्पिओ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.


 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिल गेट्स यांच्याशी खास चर्चा; म्हणाले...

CoronaVirus News : टाईम्स स्क्वेअरवर लागलं 'ट्रम्प डेथ क्लॉक'; 'हे' आहे कारण

CoronaVirus News : भुकेसाठी काय पण! बिस्किटांवरून मजुरांचा स्टेशनवर राडा; Video व्हायरल

CoronaVirus News : 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वाचून तुम्हीही म्हणाल लय भारी!

CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! 1500 भारतीयांवर WHO 'या' औषधांची चाचणी करणार

CoronaVirus News : लॉकडाऊनचा असाही फायदा; 40 वर्षांत जे झालं नाही ते घडलं, तुम्हीही म्हणाल अरे व्वा!

CoronaVirus News : ...म्हणून वकील आता दिसणार पांढऱ्या शुभ्र कपड्यात; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

 

Web Title: CoronaVirus Marathi News china stealing united state research corona mike pompeo sss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.