CoronaVirus News: चीनने केले कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीनचे परीक्षण; दिसून आला आशादायक 'रिझल्ट'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 12:28 AM2020-05-23T00:28:26+5:302020-05-23T00:39:59+5:30
द लॅन्सेटने एका प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे, 108 स्वस्थ तरुणांवर केलेल्या ओपन-लेबल ट्रायलचे 28 दिवसांनंतर आशादायक परिणाम दिसून येत आहेत.
लंडन :चीनमध्ये कोरोना व्हायरसवरील एका व्हॅक्सीनचे ट्रायल करण्यात आले आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, क्लिनिकल ट्रायलच्या पहिल्या टप्प्यावर पोहचणारी ही पहिलीच सुरक्षित व्हॅक्सीन असल्याचे आढळून आले आहे. तसेच, मानवी शरीरात कोरनाविरोधात आवश्यक असणारी प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासही ही व्हॅक्सीन सक्षम असल्याचे मेडिकल जर्नल 'द लॅन्सेट'मध्ये शुक्रवारी ऑनलाइन प्रसिद्ध झालेल्या एका अध्यनात म्हणण्यात आले आहे.
द लॅन्सेटने एका प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे, 108 स्वस्थ तरुणांवर केलेल्या ओपन-लेबल ट्रायलचे 28 दिवसांनंतर आशादायक परिणाम दिसून येत आहेत. मात्र, अंतिम रिझल्टचे मुल्यांकन सहा महिन्यानमध्ये केले जाईल. ही रोगप्रतिकार शक्ती कोरोनापासून बचाव करण्यास कितपत सक्षम आहे, हे सांगण्यासाठी पुढील ट्रायल आवश्यक आहे, असेही मेडिकल जर्नलमध्ये म्हणण्यात आले आहे.
CoronaVirus News: कोरोनाचा 'भयानक' परिणाम! सुकून पार 'असा' झाला 'बॉडी बिल्डर', पहा - Photo
या व्हॅक्सीनचा आलेला रिझल्ट हा एक मैलाचा दगड आहे. नवीन अॅडेनोव्हायरस टाईप 5 व्हेक्टर्ड कोविड -19 (एडी5-एनसीओव्ही) व्हॅक्सीनचा एक डोस 24 तासांत व्हायरस-स्पेसिफिक अंटिबॉडीज आणि टी सेल्स तयार करतो, यामुळे पुढील तपासणीसाठी संभाव्य उमेदवार तयार होतात, असे या ट्रायलमध्ये दिसून आल्याचे बिजिंग इस्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे प्रोफेरस वेई चेन यांनी म्हटले आहे. ते या अभ्यासाचे प्रमुख आहेत.
Pakistan Plane Crash: शेवटच्या काही सेकंदांत कॉकपिटमध्ये काय घडलं, 'हे' होते पायलटचे शेवटचे शब्द
"तथापी, या व्हॅक्सीन निर्मितीसाठी अनेक आव्हानं आहेत. रोगप्रतिकार शक्तीला चालना देण्याची क्षमता असलेली ही व्हॅक्सीन मानवाचे कोविड-१९ पासून संरक्षण करेलच असे दर्शवत नाही. हा रिझल्ट कोरोनावरील व्हॅक्सीन तयार करण्यासाठी आशादायक मार्ग दाखवतो. मात्र, अद्याप, ही व्हॅक्सीन सर्वांपर्यंत पोहोचण्यापासून आपण फार दूर आहोत, असे चीनने म्हटले आहे.
चीनची धमकी! आता अमेरिकेने परिणाम भोगायला तयार रहावे