CoronaVirus News : जबरदस्त! कोरोनावर मात करता येणार, कपड्यावर येताच व्हायरस नष्ट होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 03:22 PM2020-05-25T15:22:54+5:302020-05-25T15:24:56+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील अनेक देशांमधील विविध रुग्णालयांमध्ये लाखो लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे.

CoronaVirus Marathi News clothes will produce current will eliminate corona SSS | CoronaVirus News : जबरदस्त! कोरोनावर मात करता येणार, कपड्यावर येताच व्हायरस नष्ट होणार?

CoronaVirus News : जबरदस्त! कोरोनावर मात करता येणार, कपड्यावर येताच व्हायरस नष्ट होणार?

Next

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने आता जगभरात हाहाकार माजवला असून अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये हा आजारा वेगाने पसरत चालला आहे. आतापर्यंत जगात 55 लाख हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी तब्बल तीन लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत. जगातील अनेक देशांमधील विविध रुग्णालयांमध्ये लाखो लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

अमेरिका इंडियाना युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी कपड्यांमुळे होणारा संक्रमणाचा धोका कसा टाळता येईल यावर एक उपाय सुचवला आहे. संशोधकांनी इलेक्ट्रोस्टेटिकचा कोरोना व्हायरसवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला. इलेक्ट्रोस्युटिकल्समध्ये माणसांना कोणतीही इजा न पोहोचता कमजोर इलेक्ट्रिक फिल्डचा वापर काही आजार बरे करण्यासाठी केला जातो. शास्त्रज्ञांच्या मते, जर कपड्यांवर इलेक्ट्रिक फिल्ड निर्माण केलं, तर त्यावरील व्हायरस नष्ट होऊ शकतो.

शास्त्रज्ञांनी करंट निर्माण करणारा एक कापड तयार केलं आहे. या करंटमुळे त्या कपड्यावरील व्हायरसचा नाश होईल आणि संक्रमण पसरण्यापूर्वीच कपडा व्हायरसमुक्त होईल. या संशोधनाचे प्रमुख अभ्यासक आणि इंडियाना सेंटर फॉर रिजनरेटिव्ह मेडिसीन अँड इंजिनीअरिंगचे संचालक चंदन सेन आणि त्यांच्या टीमने इलेक्ट्रोस्युटिकल कापडाला पीपीई किटसाठी अधिक उपयोगी म्हटलं आहे. तसेच कोरोना व्हायरसपासून बचावासाठी कपड्यांवर अभ्यास सुरू केला आहे.

अभ्यासात मास्कवर सर्वात जास्त भर दिला जातो आहे . शास्त्रज्ञांनी मास्कवर व्हायरसचा नाश कसा होईल आणि त्याला हात लावल्यानंतर संक्रमण पसरणार नाही असा मास्क बनवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र कपड्यांमार्फतही कोरोना  व्हायरस पसरतो. व्हायरस असलेल्या कपड्यांना हात लावल्यानंतर असे हात तोंडाला लावले तर कोरोना शरीरात प्रवेश करण्याचा धोका वाढतो. मात्र या संशोधनानंतर आता कपड्यांपासून होणारा संक्रमणाचा धोका टाळता येईल अशी आशा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 'या' तीन कारणांमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका

CoronaVirus News : लग्न झाले अन् घरी जाण्याऐवजी नवरा-नवरी थेट रुग्णालयात पोहोचले; 'हे' आहे कारण

देशात उष्णतेची लाट! 'या' 5 राज्यांत 'रेड अलर्ट'; 47 डिग्रीपर्यंत पोहचू शकतं तापमान

CoronaVirus News : आनंदाची बातमी! 4 लस वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात; आरोग्यमंत्र्यांची दिलासादायक माहिती

CoronaVirus News : धक्कादायक! केस कापायला गेले अन् कोरोना घेऊन आले; तब्बल 91जण पॉझिटिव्ह झाले

CoronaVirus News : कोरोना नाही तर 'या' गोष्टींची वाटतेय लोकांना सर्वात जास्त भीती

सुपरफास्ट तंत्रज्ञान! फक्त एका सेकंदात तब्बल 1000 चित्रपट डाऊनलोड; इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड

Web Title: CoronaVirus Marathi News clothes will produce current will eliminate corona SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.