CoronaVirus News : जगाला कोरोनाचा विळखा! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 12:39 PM2020-05-01T12:39:06+5:302020-05-01T12:43:21+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 234,133 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 2,34,133 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 33 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 3,308,901 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 1,042,993 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत.
कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 63,871 बळी घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत असून तब्बल 1,095,304 कोरोनाग्रस्त आहे. अमेरिकेसह इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेखालोखाल इटलीमध्ये 27,967 कोरोनाग्रस्त असून 27 हजार, 967 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये मृतांचा आकडा 24 हजार 543 वर गेला असून रुग्णांची संख्या 24,543 आहे. फ्रान्समध्ये 24,376 तर ब्रिटनमध्ये 26,771 कोरोनाग्रस्त आहेत. कोरोना व्हायरसमुळे फ्रान्समध्ये 24 हजार 376 जणांचा तर ब्रिटनमध्ये 26 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारतात 35,043, जर्मनीत 163,009, रशियामध्ये 106,498, चीनमध्ये 82,874, इराणमध्ये 94,640, तुर्कीमध्ये 120,204 कोरोनाग्रस्त आहेत. भारतात कोरोनामुळे 1,154 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोना (कोविड-19) बाधितांची संख्या वेगाने वाढत असली तरी, कोरोनाला परताविणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. कोरोनाशी यशस्वी सामना करणाऱ्यांमधे अगदी सोळा दिवसांच्या नवजात अर्भकापासून ते नव्वदीवरील ज्येष्ठ व्यक्तींचाही समावेश आहे. जगभरातील दहा लाखांहून अधिक व्यक्तींनी कोरोनाला परतावून लावले आहे. बाधितांपैकी जवळपास 97 टक्के रुग्णांमधे कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत.
CoronaVirus News : "...तर येत्या 3 महिन्यांत कोरोनावर लस उपलब्ध होणार"https://t.co/HET183M1i1#CoronaUpdatesInIndia#Covid_19india
— Lokmat (@MiLOKMAT) April 30, 2020
जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 33 लाखांवर गेली असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. अमेरिकेत बाधितांची संख्या दहा लाखांवर गेली असली, तरी तेथील बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल 1 लाख 47 हजार आहे. तर, सव्वादोन लाखांहून अधिक रुग्ण असलेल्या स्पेनमधील सव्वा लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. इटली 71 हजार आणि फ्रान्समधील पन्नास हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जर्मनीतील एक लाख 60 हजारांपैकी 1 लाख 20 हजार रुग्ण बरे झाले आहेत. जर्मनीमधे बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा अधिक दिलासा देणारा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : दिलासादायक! जगभरात आतापर्यंत दहा लाख रुग्णांची झाली कोरोनातून मुक्तता!
CoronaVirus News : "...तर येत्या 3 महिन्यांत कोरोनावर लस उपलब्ध होणार"