CoronaVirus News : बापरे! लस तयार झाली तरी कोरोना पाठ सोडणार नाही; तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 10:53 AM2020-05-29T10:53:49+5:302020-05-29T10:54:54+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 59 लाखांवर गेली आहे. तर तब्बल 362,024 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वच देश सज्ज झाले आहेत. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 59 लाखांवर गेली आहे. तर तब्बल 362,024 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. लस तयार करण्याचं काम हे जगभरात युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनावर औषध कधी येईल याचीच सर्वजण वाट पाहत आहेत. मात्र कोरोना व्हायरसवर लस आली तरी कदाचित कोरोना पाठ सोडणार नाही. तो आपल्यासोबत असाच कायम राहिल अशी शक्यता आता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. एचआयव्ही, गोवर, कांजण्या यांच्यासारखा तो स्थानिक होऊन जाईल. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसची लस आली तरी कोरोना व्हायरस जाणार नाही.
CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनावर लवकरच मात करता येणारhttps://t.co/xzxhcmEHm3#CoronaUpdatesInIndia#CoronavirusCrisis#coronavaccine#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 29, 2020
तज्ज्ञांच्या मते आधीपासूनच चार स्थानिक कोरोना व्हायरस आहेत. त्यांच्यामध्ये आता कोविड-19 हा पाचवा असणार आहे. याचा प्रभाव हळूहळू कमी होईल कारण लोकांची प्रतिकारक शकती वाढेल आणि आपलं शरीर वेळेसह यासाठी अनुकूल होईल. कोविड-19 हा दीर्घकाळ राहणारा व्हायरस आहे. शिकागो युनिव्हर्सिटीतील सारा कोबे यांनी हा दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस येथेच राहणार आहे. त्याच्यासह सुरक्षितरित्या कसं जगणार हा प्रश्न आहे. या व्हायरस विरोधात लढण्यासाठी प्रयत्न आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ, रुग्णांची संख्या दीड लाखांवरhttps://t.co/VUyTAcEgOy#CoronaUpdatesInIndia#CoronaVirusUpdates#CoronavirusIndia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 29, 2020
देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 7,466 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 175 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 165799 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 4706 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी (29 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 7,466 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,65,799 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 89987 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 71105 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
CoronaVirus News : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी 'या' सरकारची अनोखी मोहीमhttps://t.co/SxW92fWKHt#CoronaUpdatesInIndia#coronavirusinindia#Covid_19india
— Lokmat (@MiLOKMAT) May 29, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात नवा प्रयोग; 'या' शहरात सुरू झाले 'धन्वंतरी रथ'
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण! देशात 'या' 9 औषधांची केली जातेय चाचणी
CoronaVirus News : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; आईला सांभाळण्यासाठी पैसे नसल्याने मुलाचं भयंकर कृत्य
CoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला