CoronaVirus News : 'कोरोनामुळे जगभरातील परिस्थिती आणखी बिघडतेय'; WHO ने दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 01:25 PM2020-06-09T13:25:37+5:302020-06-09T13:25:51+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 71 लाखांच्या वर गेली आहे. तर तब्बल चार लाखांहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

CoronaVirus Marathi News corona situation worsening globally says who | CoronaVirus News : 'कोरोनामुळे जगभरातील परिस्थिती आणखी बिघडतेय'; WHO ने दिला गंभीर इशारा

CoronaVirus News : 'कोरोनामुळे जगभरातील परिस्थिती आणखी बिघडतेय'; WHO ने दिला गंभीर इशारा

Next

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 71 लाखांच्या वर गेली आहे. तर तब्बल चार लाखांहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. अनेक देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून गंभीर परिस्थिती आहे. कोरोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतच गंभीर इशारा दिला आहे. 

जगभरातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. काही देशांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषणा केली आहे. तर काही देशांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहेत. याच दरम्यान WHO ने जगभरात कोरोनाची परिस्थिती बिघडत चालली असल्याची माहिती दिली आहे. रविवारी सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध अथवा लस अद्याप उपलब्ध झालेलं नाही. जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

 

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एदनहोम गेब्रेयासिस यांनी युरोपातील परिस्थिती सुधारत आहे. मात्र जगभरात कोरोनामुळे परिस्थिती बिघडली आहे. गेल्या 10 दिवसांत कोरोनाची एक लाख प्रकरणं समोर आल्याची माहिती दिली आहे. तसेच रविवारी जवळपास 1 लाख 36 हजार लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. रविवारी जी आकडेवारी आली त्यामधील 75 टक्के रुग्ण हे एकूण 10 देशांमधील होते. यामध्ये अमेरिका आणि दक्षिण आशियाची आकडेवारी सर्वाधिक आहे असल्याचं म्हटलं आहे. 

अमेरिकेत सध्या जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूवरुन आंदोलन सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आंदोलनकर्त्यांना सुरक्षेची सर्व काळजी घ्या असा सल्ला दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनासंदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं नसलेल्या अनेक व्यक्तीची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोना व्हायरसचा प्रसार होतो का? याबाबत WHO ने आता खुलासा केला आहे. एसिंप्टोमेटिक म्हणजेच लक्षणं नसलेल्या रुग्णांपासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका कमी असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : NDRFमध्ये कोरोनाचा 'विस्फोट'; पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान' दरम्यान तैनात 50 जवान पॉझिटिव्ह

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात देशवासियांना मोठा दिलासा! 'ही' आकडेवारी पाहून म्हणाल अरे व्वा!

CoronaVirus News : लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोना पसरतो का?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती

Today's Fuel Price: इंधन दरवाढ सुरू! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार

बापरे! दोन महिन्यांत तब्बल 14 धक्के; दिल्लीत मोठ्या भूकंपाचे संकेत?

'इम्रान खानपेक्षा आदित्यनाथांचं नेतृत्व चांगलं'; पाकिस्तानात योगींचं भरभरून कौतुक

Web Title: CoronaVirus Marathi News corona situation worsening globally says who

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.