CoronaVirus : आता घरबसल्या फक्त 25 मिनिटांत होईल कोरोना टेस्ट, 'या' देशानं विकसित केली नवी 'टेक्नीक'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 09:32 PM2020-06-22T21:32:37+5:302020-06-22T21:44:03+5:30
लाळेपासून कोरोना व्हायरसचे निदान करण्याचे हे तंत्र, निहोन विद्यापीठाचे प्राध्यापक मासायसू कुहारा आणि त्यांच्या टीमने विकसित केले आहे.
टोक्यो : कोरोना व्हायरसने जगभरात आतापर्यंत लोखो लोकांचे बळी घेतले आहेत, तर लाखो लोकांना त्याची लागण झाली आहे. संपूर्ण जग कोरोनापुढे हतबल झाले आहे. अनेक देश कोरोना टेस्टचे तंत्रज्ञान, व्हॅक्सीन अथवा औषधीसंदर्भात काम करत आहेत. यातच आता जपनमधील वैज्ञानिकांनी एक नवे तंत्रज्ञान विकसनत केले आहे. या तंत्रामुळे घरबसल्या अवघ्या 25 मिनिटांत कोरोना टेस्ट करणे शक्य होणार आहे. जपानमधील वैज्ञानिकांनी दावा केला आहे, की मानसाच्या लाळेची तपासणी करूनही कोरोना संक्रमणासंदर्भात माहिती मिळवली जाऊ शकते.
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
कोरोना व्हायरसच्या टेस्टसंदर्भात सरकारकडून परवाना मिळवण्याची तयारी-
जपानी औषध उत्पादक कंपनी शिओनोगी (Shionogi) या तंत्रज्ञानासंदर्भात सरकारकडून परवाना मिळवण्याच्या तयारीत आहे. या तत्रज्ञानामुळे कुठल्याही टेक्नीशिअन व्यतिरिक्त अथवा विशेष उपकरणाच्या वापराविना मोठ्या प्रमाणावर कोरोना टेस्ट करणे शक्य होईल, असा दावा करण्यात येत आहे. लाळेपासून कोरोना व्हायरसचे निदान करण्याचे हे तंत्र, निहोन विद्यापीठाचे प्राध्यापक मासायसू कुहारा आणि त्यांच्या टीमने विकसित केले आहे.
CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण
जपानचे आरोग्य मंत्रालय करत आहे परीक्षण -
जपानचे आरोग्य मंत्रालय या टेस्ट कीटचे परीक्षण करत आहे. जर ही कीट यशस्वी ठरली, तर काही दिवसांतच तीला सरकारची मंजुरी मिळेल. जपानमध्ये लॉकडाउन काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहे. या शिवाय सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासाला सूट दिली, तर बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला पॉलीमरेज चेन रिअॅक्शन टेस्ट करणे बंधन कारक आहे.
3 ते 5 तास नाही, फक्त 25 मिनिटांत रिझल्ट -
पीसीआर डायग्नोस्टिक टेस्टचा रिझल्ट येण्यासाठी जवळपास तीन ते पाच तासांचा वेळ लागतो. एअरपोर्टवर लोकांची गर्दी झाल्यास कोरोना व्हायरस संक्रमाणाची भीतीही वाढेल आणि टेस्ट संदर्भातही अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. मात्र, लाळेच्या माध्यमाने प्रवाशांची कोरोना टेस्ट केली गेली, तर त्यांना केवळ 25 ते 30 मिनिटांतच त्याचा रिझल्ट मिळू शकेल.
जपानमध्ये 17 हजारहून अधिक कोरोना बाधित -
जपानमध्ये आतापर्यंत 17,864 रुग्ण आढळून आले आहेत. तर 953 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. येथे लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यात आल्याने रुग्ण वाढण्याचा वेग वाढला आहे.
CoronaVirus News: कोरोनाचं 'हे' रूप इतर Covid-19च्या रुपापेक्षा 10 पट घातक, देण्यात आलं असं नाव